• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 22, 2024

अपघातग्रस्त चालकाचे वेतन देण्यास महापालिका सकारात्मक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
अपघातग्रस्त चालकाचे वेतन देण्यास महापालिका सकारात्मक

महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्याची पालिका आयुक्तांकडून दखल

नवी मुंबई : एनएमएमटीच्या बसमधील अपघातात जखमी चालकाला उपचारासाठी मदत न करणे व त्यानंतर त्याचे वेतन थांबविणे असे प्रकार नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून होताच महाराष्ट्र कर्मचारी युनियन व कामगार नेते रविंद्र सावंत संबंधित अपघातग्रस्त चालकाच्या मदतीला धावून गेले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पालिका प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याला वेतन देण्याचे मान्य केले आहे.

एनएमएमटी उपक्रमातील आसूडगाव डेपोतील चालक राजकुमार सोनकांबळे हे १६ ऑक्टोबर २०२४ रोजी एनएमएमटीची बस मार्ग क्रं ५९ ही बस घेऊन जात असताना पनवेल येथील आदई तलावाजवळ चालकाच्या बाजूचा दरवाजा अचानक उघडून झालेल्या अपघातात त्यांच्या डाव्या पायाला जबरी मार लागून पाय फॅक्चर झाला आहे. अपघातानंतर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात राहावे लागले. एकतर ऑनड्यूटी अपघात झालेला असताना संबंधित चालकाच्या उपचाराची सर्व जबाबदारी पालिका प्रशासनाने उचलणे आवश्यक होते. परंतु पालिका प्रशासनाने उपचाराचा खर्च न उचलल्याने महाराष्ट्र कर्मचारी युनियनने त्या कर्मचाऱ्याच्या खर्चाची जबाबदारी उचलली. पालिका प्रशासनाने त्या कर्मचाऱ्याची औषधोपचाराची जबाबदारी घेतली नाहीच उलटपक्षी त्या कर्मचाऱ्याचा उपचार कालावधीतील वेतनही रखडवले. यामुळे प्रशासनाच्या कृतीविरोधात महाराष्ट्र कर्मचारी युनियनने महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर भीक मांगो आंदोलन करण्याची घोषणा केली. शनिवारी सकाळी पालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर महाराष्ट्र कर्मचार युनियनकडून आंदोलन सुरु करण्याच्या हालचाली सुरु होताच पालिका प्रशासनाने त्यांना चर्चेसाठी पालिका मुख्यालयात बोलविले. चर्चेमध्ये संबंधित अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे महापालिका प्रशासनाने चर्चेदरम्यान मान्य केले.

एनएमएमटीच्या बस चालक ऑन ड्यूटी अपघातात जखमी झालेला असताना त्या कर्मचाऱ्याचा औैषधोपचाराचा कोणताही खर्च पालिका प्रशासनाने केला नाही. उलटपक्षी संबंधित कर्मचाऱ्याचे वेतनही पालिका प्रशासनाने दिले नाही. याविरोधात महाराष्ट्र कर्मचारी युनियनने कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर  ‘भीक मॉगेा’आंदोलनाची तयारी सुरु करताच नेरूळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  व एसीपी यांनी पालिकेतील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क  साधून महापालिका आयुक्तांनी कामगार नेते रविंद्र सावंत व महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना महापालिका आयुक्तालयात चर्चेसाठी बोलावून घेतले.  प्रशासन उपायुक्त शरद पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिवहन विभातील अधिकारी आचलकर, जगताप व कामगार नेते रवींद्र सावंत, युनियनचे नितीन गायकवाड, राजन सुतार, मंगेश गायकवाड यांच्या सोबत बैठक मुख्यालयात झाली. त्यावेळी संबंधित अपघातग्रस्त चालकाचे वेतन देण्याचे मान्य केले. कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याने कर्मचाऱ्यांकडून रविंद्र सावंत यांचे आभार मानण्यात आले.

कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत हे गेल्या काही वर्षापासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. पालिका प्रशासनाने ही मागणी मान्य केल्यास कर्मचाऱ्यांवर रुग्णालयीन खर्चाचा ताण पडणार नाही व त्यांना कोणाकडे कर्ज मागण्याची वेळ येणार नाही, असे रविंद्र सावंत यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

पिंपळगाव गावठाण ते महाळुंगेसाठी रस्ता ग्रामीण क्रमांक २०७ वर झालेली अतिक्रमणे हटवा

Next Post

लवकरच पुन्हा सुरु होणार लोकनेते गणेश नाईकांचा जनता दरबार

Next Post
लवकरच पुन्हा सुरु होणार लोकनेते गणेश नाईकांचा जनता दरबार

लवकरच पुन्हा सुरु होणार लोकनेते गणेश नाईकांचा जनता दरबार

तळागाळातील लोकांसाठी कामे करा : आनंदराज आंबेडकर

तळागाळातील लोकांसाठी कामे करा : आनंदराज आंबेडकर

विवेकानंद संकुलाचा विष्णूदास भावेमध्ये मंगळवारी रंगणार ‘संगम लोककलेचा’

विवेकानंद संकुलाचा विष्णूदास भावेमध्ये मंगळवारी रंगणार ‘संगम लोककलेचा’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com