• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 3, 2024

उद्यानातील ओपन जीममधील नादुरुस्त साहित्याची दुरुस्ती करायला पालिकेला वेळ मिळेना!

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानातील ओपन जीममधील नादुरस्त साहित्याची दुरुस्ती करा : संदीप खांडगेपाटील

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या राजमाता जिजाऊ उद्यानातील ओपन जीममधील तुटलेल्या नादुरुस्त साहीत्याची दुरुस्ती करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे निवेदनांवर निवेदने सादर होऊनही महापालिका प्रशासनाला उद्यानातील ओपन जीममधील नादुरुस्त साहित्याची दुरुस्ती करायला वेळ मिळत नसल्याचे चित्र नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना व सारसोळे गावच्या ग्रामस्थांना जवळून पहावयास मिळत आहे व अनुभवयास मिळत आहे.

नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडको वसाहतीमध्ये वरुणा, सीव्ह्यू, सागरदिप या तीन गृहनिर्माण सोसायट्यांच्या मध्यभागी राजमाता जिजाऊ उद्यान व तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या उद्यानात पालिका प्रशासनाने ओपन जीम बनविलेली आहे. आजूबाजूला असणाऱ्या महागड्या व्यायामशाळेत जावून व्यायाम करणे खर्चिक असून व ते सेक्टर सहामधील अत्यल्प, अल्प व मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांच्या खिशाला परवडत नसल्याने ते ओपन जीममध्ये व्यायाम करत असतात. या ओपन जीममध्ये विशेष म्हणजे विभागातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला येथे मोठ्या संख्येने व्यायाम करताना पहावयास मिळतात. या ओपन जीममधील पायाने चालण्याचा व्यायाम करण्याचे साहित्य (पाय पुढे-मागे करण्याचा वॉकर) बिघडले आहे. पाय पुढे मागे करताना एका पायाचे साहित्य तुटले असून ते लोखंडावर आदळत आहे. त्यामुळे स्थानिक रहीवाशांना या साहित्याचा वापर करता येत नाही. समस्येचे गांभीर्य व स्थानिकांच्या व्यायामाची गरज पाहता संबंधितांना ओपण जीममधील हे नादुरुस्त साहित्य तातडीने दुरुस्त करण्याचे संबंधितांना निर्देश देण्यासाठी महापालिका आयुक्तांना अनेक लेखी तक्रारी स्थानिक भागातून सादर करुनही महापालिका आयुक्त आलेली निवेदने, तक्रारी फॉरवर्ड करण्याशिवाय काहीही करत नसल्याचे व आयुक्तांनी फॉरवर्ड केलेल्या निवेदनांवर कार्यवाही न करता संबंधित अधिकारी त्या निवेदनांना केराची टोपली दाखवत असल्याने ओपन जीममधील नादुरुस्त साहीत्याची दुरुस्ती आजतागायत झालेली नाही. ओपन जीममध्ये व्यायामासाठी येणाऱ्या नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांची व सारसोळे गावातील ग्रामस्थांची नादुरुस्त साहित्यामुळे गैरसोय होत असल्याने संबंधितांकडून महापालिका प्रशासनाच्या उदासिनतेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

Previous Post

धुळीचे प्रदूषण पसविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर कारवाईची मागणी

Next Post

आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून हनुमान मंदिरामध्ये महाप्रसाद

Next Post
आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून हनुमान मंदिरामध्ये महाप्रसाद

आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून हनुमान मंदिरामध्ये महाप्रसाद

नेरूळ-जुईनगरमधील पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारण्याची कॉंग्रेसची मागणी

नेरूळमध्ये पालिकेच्या मल:निस्सारण केंद्रासमोरील रस्त्यावर गतीरोधक बसवा

एनएमएमटीच्या चालक व वाहकांना मेडिक्लेम योजना लागू करावी

एनएमएमटीच्या चालक व वाहकांना मेडिक्लेम योजना लागू करावी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com