• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 27, 2024

शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेकरीता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
प्रभाग ३४ मधील साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबवा : सुजाता सुरज पाटील

माजी नगरसेविका सुजाता पाटील यांचे महापालिका आयुक्तांना साकडे
नवी मुंबई (प्रतिनिधी) : महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेकरीता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल, विधवा, निराधार, स्थानिक प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, नाका कामगार व मागासवर्गीय घटकातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे ही योजना ऑनलाईन पद्धतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांकरीता महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. या योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३० नोव्हेंबर २०२४ असून हे अर्ज www.schemenmmc.com या संकेतस्थळावर स्विकारण्यात येत आहेत. महापालिका प्रशासन शैक्षणिक शिष्यवृत्ती ही राबवित असलेली योजना प्रशंसनीय असून महागाईच्या काळात खासगी शाळांमध्ये मुलांना शिक्षण देणाऱ्या गरीब पालकांना या योजनेचा हातभार लागत असतो. अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत असते. गरजू लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही महापालिका प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत असल्याचे सौ. सुजाता सुरज पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
यंदा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूका, मतदान , निकाल हा कार्यक्रम २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत चालला. या निवडणूक काळात सामाजिक, शैक्षणिक. राजकीय व अन्य वर्गातील घटक व्यस्त राहीले. नवी मुंबईतील खासगी शाळांमध्ये गोरगरीब, अल्प तसेच अत्यल्प उत्पन्न गटातील पालकांची मुले शिक्षण घेत असतात. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी पोटाला चिमटा घेऊन वेळ पडल्यास उधारउसनवार करुन खासगी शाळेची फी भरत असतो. त्यांच्याकडे घरी संगणक नसतो व हातात महागडा स्मार्ट फोनही नसतो. चांगला फोन असला तरी अर्ज भरण्याबाबत फारशी माहिती नसते. दरवर्षी राजकीय पक्षांची जनसंपर्क कार्यालये व सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्यालयातूनच मोठ्या प्रमाणावर या शिष्यवृत्ती अर्जांचा ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर सादरीकरण (जमा) होत असते. यंदा राजकीय तसेच सामाजिक घटकांची जनसंपर्क कार्यालये निवडणूकीत व्यस्त असल्याने शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकडे कोणाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणे शक्य झाले नाही. आता अंतिम मुदत अवघ्या तीन-चार दिवसांनी समाप्त होणार असल्याने हजारो विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे. यामुळे खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे नुकसान होणार असून महापालिकेच्या चांगल्या योजनेचा हेतूही साध्य होणार नाही. दिवाळी व त्यानंतर विधानसभा निवडणूका ही परिस्थिती पाहता गोरगरीब वर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये यासाठी महापालिका प्रशासनाने परिस्थितीचे अवलोकन करुन शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्याकरीता मुदतवाढ देऊन १५ डिसेंबरपर्यत अर्ज सादर करण्याची मुदत वाढ देवून खासगी शाळेतील गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना व पालकांना उपकृत करण्याची मागणी सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

पराभवाचे शल्य बाजूला ठेवून संदीप नाईक जनसामान्यांमध्ये व्यस्त

Next Post

राजमाता जिजाऊ उद्यानातील तुटलेली खेळणी दुरुस्त करा

Next Post
राजमाता जिजाऊ उद्यानातील तुटलेली खेळणी दुरुस्त करा

राजमाता जिजाऊ उद्यानातील तुटलेली खेळणी दुरुस्त करा

निवडणूक आयोगाचा जनतेच्या मतांवर दरोडा : नाना पटोले

निवडणूक आयोगाचा जनतेच्या मतांवर दरोडा : नाना पटोले

प्रभाग ३४ मधील साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबवा : सुजाता सुरज पाटील

माजी नगरसेविका सुजाता पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज सादर करणेकरिता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com