• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 2, 2024

नवी मुंबई महापालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई महापालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजरा

सखापाटील जुन्नरकर : navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६

नवी मुंबई : १७ सप्टेंबरपासून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने अत्यंत उत्साहात सुरू झालेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याची आणि ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ अभियानाची सांगता वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ७५०० हून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीत भव्यतम स्वच्छता महोत्सवाच्या माध्यमातून जल्लोषात संपन्न झाली. ‘निश्चय केला, नंबर पहिला’ या ध्येयवाक्याच्या जोरदार निनादात सारे वातावरण भारून गेले होते.

याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खा. नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शिरीष आरदवाड, स्वच्छता आयकॉन सुलेखनकार अच्युत पालव व साहसी जलतरणपटू शुभम वनमाळी, नामांकित अभिनेत्री राधिका देशपांडे, दिपाली पानसरे, केतकी नारायण, भाग्यश्री मोटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आज ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याची सांगता असली तरी पुढे कायम राखावयाच्या स्वच्छतेचा हा शुभारंभ असल्याचे मत यावेळी ठाणे लोकसभा सदस्य खा. नरेश म्हस्के यांनी व्यक्त करीत नवी मुंबई महापालिकेने या मोहीमेत ज्यांच्या खांद्यावर उद्याचे भविष्य आहे, अशा विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी करून घेतल्याबद्दल प्रशंसा केली. स्वच्छता ही उपदेश करण्याची गोष्ट नाही तर प्रत्यक्ष कृती करूनच स्वत:पासून सुरूवात करायला हवी, असे त्यांनी सांगितले. महापालिका आणि जनता यांनी एकत्र येऊन स्वच्छतेची मानसिकता ठेवली तर काहीच अशक्य नाही असे सांगत खा. नरेश म्हस्के यांनी आपल्यासमोर कोणी अस्वच्छता करीत असेल तर त्याला त्यापासून रोखणे हे देखील शहराप्रती आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करण्यासारखेच आहे असे मत मांडले.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यात दररोज ठिकठिकाणी होणा-या विविध उपक्रमांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले त्याबद्दल आभार मानले. नाविन्यपूर्ण कामांमुळे नवी मुंबईची देशात वेगळी ओळख असून त्यामध्ये नागरिकांच्या नेहमीच मिळणा-या सहकार्याचा महत्वाचा वाटा असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. या अभियानामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेत लहान वयापासूनच त्यांच्यावर स्वच्छतेचा संस्कार करण्याचा उद्देश विविध स्पर्धात्मक उपक्रमांतून सफल झाल्याबद्दल आयुक्तांनी आनंद व्यक्त केला. यापुढील काळात ‘वेस्ट टू एनर्जी’ तसेच ‘टेक्सटाईल रिसायकलींग’ यासारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून नवी मुंबईचा नावलौकिक देशपातळीवर अधिक उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जगप्रसिध्द आफ्रिन बँडच्या तालावर उपस्थित सूरांसमवेत रंगले व त्यांच्यासह ‘वंदे मातरम्’ चा गजर केला गेला. सुप्रसिध्द स्टँड अप शोमन श्री.सुशांत घाडगे यांनी स्वच्छतेच्या सवयींवर व विसंगतीवर हसतखेळत भाष्य केले. नमुंमपा शाळा क्र. 78 गौतमनगर, रबाळे यांनी स्वच्छता दिंडीच्या सादरीकरणातून परंपरेचे रंग भरले तसेच अल्पेश डान्स ॲकेडमीच्या समुहाने बहारदार स्वच्छता नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन करीत सुरू झालेल्या या महोत्सवामध्ये सफाईमित्र एसटीपी ऑपरेटर निकेश पाटील व रमेश इंगळे तसेच स्वच्छतामित्र महादेव सोनावणे व स्वच्छता सखी सुजाता भोसले यांना ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ यांचे प्रत्येकी २ –२ लाख असे ४ लाख रक्कमेचे विमा कवच प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आले.

‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यात शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छताविषयक विविध स्पर्धांतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये निबंध स्पर्धेत सेंट मेरी स्कुल वाशीचा विद्यार्थी गितेश सहारकर तसेच वक्तृत्व स्पर्धेत मॉडर्न स्कुल वाशीचा विद्यार्थी दक्ष दत्तात्रय वगरे या १० हजारहून अधिक सहभागी विद्यार्थ्यांतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा विजेता आयसीएल स्कुल वाशीचा विद्यार्थी विजय प्रकाश वायदंडे व व्दितीय क्रमांकाची विद्यार्थिनी नमुंमपा शाळा क्र. २९ जुहूगाव येथील आर्या आवळे यांनाही पारितोषिके प्रदान करण्यात आली.

याशिवाय ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत सहयोग देणाऱ्या संस्था लेट्स सेलिब्रेट फिटनेसच्या  रिचा समित, डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग संस्थेचे श्रीसदस्य प्रतिनिधी, तृतीयपंथियांच्या किन्नर माँ ट्रस्टच्या प्रमुख अनिता वाडेकर, एनएसएस युनीटचे जिल्हा समन्वयक नितीन देशमुख, स्वच्छता उपक्रमात सीएसआर सहकार्य देणारे कन्सर्टो पेमेंट सिस्टीम आर्किटेक्ट यांचाही गौरव करण्यात आला.

सिडको एक्झिबिशन सेंटरला पताका व स्वच्छता फलकांनी सजवून महोत्सवाचे स्वरूप देण्यात आले होते. याठिकाणी शालेय स्तरावर ४१३ शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या १ लाखाहून अधिक विद्यार्थी सहभाग लाभलेल्या टाकाऊपासून शोभिवंत वस्तू निर्मिती प्रदर्शनाच्या मोठ्या स्टॉलला आयुक्त व मान्यवरांप्रमाणेच इतर नागरिकांनी भेट देऊन टाकाऊपासून नाविन्यपूर्ण वस्तू निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

याशिवाय कचरा विषयाशी संबंधित आगळ्यावेगळ्या खेळांच्या ३ स्टॉलवरही बच्चे कंपनीने गर्दी करीत आनंद घेतला. प्लास्टिकला कापडी पिशव्यांचा पर्याय असणारा स्टॉल तसेच समाजविकास, आरोग्य, उद्यान विभागांच्या स्टॉललाही नागरिकांनी भेट दिली व माहिती जाणून घेतली. बीजमोदक, ऑरगॅनिक अगरबत्ती, होम कम्पोस्टींग साहित्य यांचेही स्टॉल गजबजलेले होते. विशेषत्वाने ओलू, सुकू आणि घातकू हे राष्ट्रीय स्तरावर गाजलेले ३ मॅस्कॉट आणि स्वच्छतेचा आकर्षक सेल्फी स्टॅंड यावर छायाचित्रे काढण्यासाठी नागरिक व विद्यार्थीही उत्साही होते.

Previous Post

अखेर सिडकोने जमिनी फ्री होल्ड केल्याने लाखो लोकांचा होणार फायदा : विजय नाहटा

Next Post

पाणी पुरवठा देयकांच्या अभय योजनेस १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Next Post
नेरूळच्या बकालपणास महापालिकेचा अतिक्रमण विभागच जबाबदार

पाणी पुरवठा देयकांच्या अभय योजनेस १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

महापालिकेची सीबीएसई शाळा क्रमांक ९४ चा M/S EDUCANTUM.INC  या खासगी संस्थेशी असलेला करार रद्द करण्याची कॉंग्रेसची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com