• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 18, 2024

प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्क्यांचा हक्काचा परतावा म्हणून सदर भूखंडावर अल्प दरात अथवा मोफत घरे द्यावी : गजानन काळे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
‘शिवनेरीवर जाऊया, महाराजांचा स्पर्श अनुभवूया’ मनसेचे मोफत किल्ले दर्शन

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबईत महागड्या अशा पाम बीच रोड, बेलापूर, सेक्टर-१५(अ) येथील भूखंड क्रमांक-२० वर खासदार, आमदारांसह भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्च पदस्थ अधिकारी, न्यायाधीश अशा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी करोडो रुपये खर्च करून ३५० घरांचा समावेश असलेला आलिशान ‘महानिवास’ गृहप्रकल्प सिडकोने बांधणे प्रस्तावित आहे. या आलिशान ‘महानिवास’ प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून टाटा कन्सल्टन्सी आणि हितेन सेठी अँड असोसिएटस यांची संयुक्तपणे नियुक्ती केली आहे. त्यासाठी तब्बल २८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा अनाठायी खर्च असल्याचे दिसून येते. तसेच प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी मे. आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी संबंधित कंपनीला १५ कोटी रुपये सल्लागार शुल्क दिले जाणार आहे. आता पर्यंत या प्रकल्पातील घरांसाठी ५३३ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी अर्ज केले आहेत. सध्या या अर्जाच्या छाननीचे काम सुरू आहे. सरकारने यांची नावे जाहीर करावी अशी मागणी मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुळातच एमएमआरडीए क्षेत्रात ज्यांची घरे आहेत, त्यांना सिडकोच्या योजनेचा फायदा घेता येत नाही असा सिडकोचा नियम आहे. जवळपास सर्व अतिमहत्वाच्या (आमदार, खासदार इत्यादी) व्यक्तींची घरे एमएमआरडीए क्षेत्रात असताना त्यांच्यासाठी असा प्रकल्प का राबवला जातोय हा मूळप्रश्न आहे. मागील ५० वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांना त्यांचा हक्काचा साडेबारा टक्क्यांचा भूखंडाचा परतावा मिळाला नाही. हा परतावा देण्यासाठी सिडको भूखंड नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे सिडकोने हा आलिशान गृहप्रकल्प रद्द करावा व या भूखंडाचे वाटप हे प्रकल्पग्रस्तांना साडे बारा टक्के भूखंड वाटपासाठी करावे. तसेच हे शक्य नसेल तर गृहप्रकल्प उभारून साडे बारा टक्के भूखंडाचा परतावा म्हणून ही घरे मोफत किंवा अल्पदरात प्रकल्पग्रस्तांना द्यावी. तसेच यापुढे येणाऱ्या प्रत्येक योजनेत प्रकल्पग्रस्तांना घर मोफत अथवा अल्प दरात देवून त्यांच्या साडे बारा टक्क्यांचा मोबदला पूर्ण करावा, अशी मागणी गजानन काळे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देवून मुख्यमंत्री प्रकल्पग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत हे संकेत द्यावेत अशी अपेक्षा गजानन काळे यांनी केली आहे. जर हा नवी मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकल्प रद्द नाही झाला तर मनसे या प्रकल्पाची एक वीट ही उभी राहू देणार नाही असा खणखणीत इशारा गजानन काळे यांनी दिला.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहामधील तानाजी मालुसरे क्रिडांगणातील खुल्या गटारावर झाकणे बसविण्याची कॉंग्रेसची मागणी

Next Post

कर्मचाऱ्यांना सुविधा न मिळाल्यास प्रथम काळ्या फिती नंतर कामबंद आंदोलन

Next Post
शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

कर्मचाऱ्यांना सुविधा न मिळाल्यास प्रथम काळ्या फिती नंतर कामबंद आंदोलन

‘नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या सूचनांच्या अंतर्भाव करून आजतागायतची सर्व बांधकामे आहे त्या स्थितीत नियमित करावीत, मगच जीआर काढावा’

‘नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या सूचनांच्या अंतर्भाव करून आजतागायतची सर्व बांधकामे आहे त्या स्थितीत नियमित करावीत, मगच जीआर काढावा’

नवी मुंबईतल्या दोन्ही आमदारांच्या राजीनाम्याची मनसेकडून मागणी

नवी मुंबईतल्या दोन्ही आमदारांच्या राजीनाम्याची मनसेकडून मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com