• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 29, 2024

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणस्थळी जलपूजन संपन्न

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणस्थळी जलपूजन संपन्न

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६

नवी मुंबई : स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महानगरपालिका असून मोरबे धरणामुळे नवी मुंबई ही जलसमृध्द महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खालापूर तालुक्यात असलेले ४५० द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचे मोरबे धरण पूर्ण भरले असून गुरुवारी आ. गणेश नाईक व महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते मोरबे धरण प्रकल्पस्थळी पारंपारिक पध्दतीने जलपूजन करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. तसेच माजी महापौर जयवंत सुतार व सुधाकर सोनवणे, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे उपस्थित होते.

मुंबईनंतर नवी मुंबई ही स्वत:च्या मालकीचे धरण असणारी एकमेव महानगरपालिका असून हा दूरदृष्टीचा निर्णय असल्याचे मत व्यक्त करीत ऐरोली विधानसभा सदस्य आ. गणेश नाईक यांनी नवी मुंबईची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याच्या इतर जलस्त्रोतांचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी मोरबे धरण यावर्षी ऑगस्ट महिन्यातच पूर्ण भरले असून ही आपल्या नवी मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट असल्याचे सांगत ही निसर्गाची कृपा असल्याचे मत व्यक्त केले. नवी मुंबईकरांना स्वच्छ, शुध्द व पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने समन्यायी जलवितरण व्यवस्था करण्यात येत असून भविष्यातली लोकसंख्येची वाढ लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

मोरबे धरण क्षेत्रात यावर्षी उत्तम पर्जन्यवृष्टी झाली असून अत्यंत कमी कालावधीत म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच धरण पूर्ण भरलेले आहे. या क्षेत्रात आजतागायत ३३७४ मिमी पावसाची नोंद झालेली असून पाण्याची पातळी पूर्ण ८८ मीटर इतकी भरलेली आहे. धरणात १९१.४६३ द.ल.घ.मी. इतका जलसाठा असून त्यामधील पाण्याचा गुरुवारी विसर्ग करण्यात आला.

अशाचप्रकारे प्रत्येक वर्षी मोरबे धरणातील जलसाठा पूर्ण भरावा अशी मनोकामना करीत जलपूजन संपन्न झाले. मोरबे धरणामध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध असला तरी सुज्ञ नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहनही करण्यात येत आहे.

Previous Post

चित्रकला समाज जागृतीचे प्रभावी माध्यम – संदीप नाईक

Next Post

नवी मुंबईमध्ये रोजगाराच्या विपुल संधी : संदीप नाईक

Next Post
नवी मुंबईमध्ये रोजगाराच्या विपुल संधी : संदीप नाईक

नवी मुंबईमध्ये रोजगाराच्या विपुल संधी : संदीप नाईक

नेरूळ सेक्टर चार ते सानपाडा पामबीच भागातील केसर सॉलिटर बिल्डींगपर्यंत महापालिका प्रशासनाने सर्व्हिस रोडची निर्मिती करण्याची काँग्रेसची मागणी

नेरूळ सेक्टर चार ते सानपाडा पामबीच भागातील केसर सॉलिटर बिल्डींगपर्यंत महापालिका प्रशासनाने सर्व्हिस रोडची निर्मिती करण्याची काँग्रेसची मागणी

ज्याचे आमदार जास्त, त्याचाच मुख्यमंत्री : शरद पवार

ज्याचे आमदार जास्त, त्याचाच मुख्यमंत्री : शरद पवार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com