• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 9, 2024

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदी निवडीचा नवी मुंबईत जल्लोष

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदी निवडीचा नवी मुंबईत जल्लोष

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील

संपर्क : ८३६९९२४६४६ – Navimumbailive.com@gmail.com

 नवी मुंबई :  नरेंद्र मोदी यांची देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा  निवड झाली असून  याचा जल्लोष  नवी मुंबई भाजपा जिल्ह्याच्या वतीने  जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  शनिवारी साजरा करण्यात आला.

 वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला. संगीताच्या तालावर  कार्यकर्त्यांनी नृत्यही केले.  शिवाजी चौक यावेळी भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यांनी  बहरून गेला होता. यावेळी प्रतिक्रिया देताना डॉक्टर संजीव नाईक यांनी  मोदीजी तिसऱ्यांदा  पंतप्रधानपदी विराजमान होणार असून  देशाची सेवा करण्यास सज्ज झाल्याचे  सांगितले.  आगामी  पाच वर्षांमध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी काम सुरू होईल. मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार  आपल्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून  पुढील पाच वर्षांची पायाभरणी देखील करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलणार असल्याचा  अपप्रचार विरोधकांनी केला. मोदीजींचे सरकार पुन्हा येणार नाही असा दावा विरोधक करत होते परंतु तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होणार आहे, असे सांगून  विरोधक आरोप करीत राहतील, सत्ताधारी म्हणून जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याचं काम आम्ही करू. लोकसभा निवडणुकीत राहिलेल्या उणिवा दूर करून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये  घवघवीत यश प्राप्त करू. असा विश्वास डॉक्टर नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. आजच्या आनंदोत्सवामध्ये  अनंत सुतार, रवींद्र इथापे, दशरथ भगत  माधुरी सुतार, नेत्रा शिर्के, नवीन गवते, अमित मढवी, सुनिकेत हांडेपाटील, अरुण पडते  यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी लोकप्रतिनिधी  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

दुष्काळाने होरपळणा-या महाराष्ट्रातील जनतेला तातडीने मदत द्या – नाना पटोले

Next Post

कुकशेत गावातील रस्त्यावरील बंद पडलेले पथदिवे सुरु करा : संदीप खांडगेपाटील

Next Post
कुकशेत गावातील रस्त्यावरील बंद पडलेले पथदिवे सुरु करा : संदीप खांडगेपाटील

कुकशेत गावातील रस्त्यावरील बंद पडलेले पथदिवे सुरु करा : संदीप खांडगेपाटील

पर्यावरणप्रेमी युगांतर मित्र मंडळाकडून वृक्षारोपणाची परंपरा कायम

पर्यावरणप्रेमी युगांतर मित्र मंडळाकडून वृक्षारोपणाची परंपरा कायम

नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा

नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com