• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 6, 2024

अनधिकृत होर्डीगवर कारवाई व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिका हद्दीत लागणाऱ्या अनधिकृत होर्डीगवर कारवाई करण्याचे व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अतिक्रमण विभागाला आदेश देण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीने महाराष्ट्र प्रदेश महासचिव आणि एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहरामध्ये पालिका हद्दीत ठिकठिकाणी प्रभागाप्रभागात मोठ्या प्रमाणावर तसेच पथदिव्यावरही अनधिकृत होर्डींग लागत आहेत. इतकेच नाही तर बसथांब्यावरील लोखंडी कमानी वर तसेच आता नव्याने केलेल्या बसथांब्यातील अंर्तगत भागातही बॅनर, होर्डीग लावले जात आहे. पालिका उद्यानात अथवा सार्वजनिक ठिकाणीही बॅनर व होर्डींगने जागा व्यापलेली दिसून येत आहे. अनधिकृत होर्डींगमुळे परिसराला बकालपणा येत आहे व महापालिकेचे आर्थिक नुकसानही होत आहे. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे महापालिका प्रशासनाला अधिकार आहेत. तथापि महापालिकेचा अतिक्रमण विभाग अनधिकृत फलक, बॅनर व होर्डीग विरोधात कारवाई करत नसल्याने अनेक दिवस, महिने काही ठिकाणी वर्षभरही बॅनर, होर्डीग, फलक पहावयास मिळत आहे. मुख्य रस्त्यावरील बॅनर हटविले जात असले तरी अंर्तगत भागातील बॅनरला अभय मिळत आहे. या अनधिकृत बॅनरमुळे पालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत असतानाही अतिक्रमण विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. महापालिका हद्दी मुख्य भागात तसेच अंर्तगत भागात लावल्या जाणाऱ्या अनधिकृत बॅनरवर दररोज कारवाई करण्याचे व अनधिकृत बॅनर, होर्डींग लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

घणसोली, कोपरखैराणे नागरी आरोग्य केंद्रातील समस्या सोडवा : महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे महापालिका आयुक्तांना साकडे

Next Post

उलवे नोडमध्ये पेट्रोलपंपाची सुविधा उपलब्ध करुन द्या एमआयएमचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Next Post
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

उलवे नोडमध्ये पेट्रोलपंपाची सुविधा उपलब्ध करुन द्या एमआयएमचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सानपाड्यातील महापालिका उद्यान प्रवेशद्वारालगतचे कचऱ्याचे ढिगारे हटवा

सानपाड्यातील महापालिका उद्यान प्रवेशद्वारालगतचे कचऱ्याचे ढिगारे हटवा

लोकोपयोगी उपक्रमातून एमआयएमकडून रमजान ईद उत्साहात साजरी

लोकोपयोगी उपक्रमातून एमआयएमकडून रमजान ईद उत्साहात साजरी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com