• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 7, 2024

नवी मुंबईत साकारणार महाराष्ट्र भवन, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबईत साकारणार महाराष्ट्र भवन, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : आज नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भवन व्हावे अशी गेल्या अनेक वर्षापासून माझी मागणी होती. त्याला आज खऱ्या अर्थाने मुहूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. ५ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक पार पडली. या बैठकीत नवी मुंबईमधील वाशी येथे उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन प्रकल्पाचे  भव्यदिव्य वास्तूचे अंतरीम सादरीकरण करण्यात आले. तसेच महाराष्ट्र भवनाची वास्तू कशी असेल ते मी आज प्रत्यक्ष पाहून माझ्या जीवनातला आनंद मावेनासा झाला आहे की महाराष्ट्र भवनाची वास्तू बघितल्यावर खरंच देशात असा महाराष्ट्र भवन असेल की नाही अस मला वाटत नाही, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया भाजपा बेलापुर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

सदर महाराष्ट्र भवन हे १४ मजली असून त्याचबरोबर अशा या सुंदर महाराष्ट्र भवनामध्ये अभ्यागतांसाठी स्वागत कक्ष, प्रतीक्षा कक्ष, भोजन कक्ष, प्रीफेशनल एरीया, बंक्वेट हॉल, सूट रूम, ज्यूस कॅफ, टी- कॅफ, कॉफी-कॅफ, बैठक कक्ष, ई-लायब्री, कॉनफरंन्स हॉल, फूड प्लाझा विश्रांती कक्ष, व्ही.आय.पी. रूम तसेच लोकप्रतिनिधीं सोबत येणारे त्यांचे सारथी, सहकारी, वाहन चालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता ही विश्रांती रूम असणार आहेत. त्याचबरोबर अशा अनेक विविध प्रकारच्या सुसज्ज सुख-सुविधांची रेलचेल या महाराष्ट्र भवनामध्ये पहावयास मिळणार आहेत. तसेच महाराष्ट्र भवनाचे प्रथम दर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य बैठी पुतळा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने भवनामध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजाचे दर्शन घेऊन त्यानंतरच महाराष्ट्राची आठवण होणार असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. 

 तसेच महाराष्ट्र भवनाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लागल्यामुळे अशी प्रथमच वास्तू महाराष्ट्रामध्ये उभी राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालक व अधिकारी वर्ग यांचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आभार मानले.

तसेच त्यापुढे म्हणाल्या की, नवी मुंबई शहर वसवितांना सिडको मार्फत वाशी येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून दिले गेले. राज्य निहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने नवी मुंबई वाशी येथे उभी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अशा विविध ठिकाणाहून नागरिक कामांसाठी विविध स्पर्धा परीक्षा व नोकर भरतीसाठी मुंबई येथे येत असतात. मात्र जागा नसल्याने व हॉटेलचा खर्च परवडत नसल्याने अनेक जण मिळेल तो आसरा शोधतांना दिसतात. ज्या महाराष्ट्र भवनासाठी सन २०१४ पासून माझा जो लढा चालला होता त्याला आज पूर्णपणे पूर्णविराम लागला असून या महाराष्ट्र भवनाचा फायदा हा नवी मुंबईलाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्याला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

                                     

Previous Post

बेलापूर विधानसभामध्ये नमो चषक क्रिकेट स्पर्धा जल्लोषात संपन्न : आ. मंदाताई म्हात्रे 

Next Post

गोठिवलीमध्ये लोकनेते, आमदार गणेश नाईकांच्या उपस्थितीत ‘गाव चलो अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
गोठिवलीमध्ये लोकनेते, आमदार गणेश नाईकांच्या उपस्थितीत ‘गाव चलो अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

गोठिवलीमध्ये लोकनेते, आमदार गणेश नाईकांच्या उपस्थितीत 'गाव चलो अभियाना'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६ मधील समस्या तात्काळ सोडवा : गणेश भगत

शिष्यवृत्तीची खुल्या गटाची अट शिथील करून मुदतवाढ द्या

इमारत पुनर्बांधणीसाठी जनजागृतीस्तव महापालिका मुख्यालय व विभाग अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करा : हाजी शाहनवाझ खान

इमारत पुनर्बांधणीसाठी जनजागृतीस्तव महापालिका मुख्यालय व विभाग अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करा : हाजी शाहनवाझ खान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com