• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 30, 2024

नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने सीबीडी  येथील सुनील गावस्कर मैदानात १० दिवस रंगलेल्या ‘नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव – २०२४’चा सांगता समारंभ हा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडला. भन्नाट अशा लावण्या व कोळीगीत नृत्यांच्या कार्यक्रमाने या ‘महोत्सवाची’  समाप्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी व नागरिकांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत नृत्य करून कार्यक्रमाचा आनंद लुटला.

 यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव-२०२४ चे आयोजन केले. गेली २७ वर्षे समाजपयोगी, शैक्षणिक, व सांस्कृतिक कार्यक्रम, नाटय, संगीत व विविध स्पर्धेचे आयोजन केले जात आहेत.  गेली १० दिवस या महोत्सवात अनेक दिग्गज मान्यवरांनी भेटी देत पोलीस बांधवांनी व लहान थोरांपासून महोत्सवाचा आनंद लुटला. तसेच गेली १० दिवस विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तूंचे स्टॉल तसेच मोठे मोठे पाळणे हे नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचे आकर्षण होते. हळदी-कुंकू समारंभ, पाककला, मेहंदी आणि पाककला, आम्ही दोघे राजाराणी या सारख्या मनोरंजक कार्यक्रमाचा आनंद सीबीडीवासिय महिलांनी लुटला. तर शेकडो विद्यार्थीनीही चित्रकला स्पर्धेत विविध प्रकारच्या चित्रांच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना स्वच्छतेचे संदेश दिले. महोत्सवामध्ये विशेष करून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहभाग घेऊन बक्षिसांची लयलूट केली असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महोत्सवात विशेष करून करून ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय ठरली असून महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांनी संस्कृती जोपासण्याचे काम या कलेच्या माध्यामातून कलाकारांनी सादर केली. तसेच खूप उत्साहात महिला-पुरुषांनी महोत्सवात सहभाग घेऊन आनंद लुटला.

तसेच सारथी सुरक्षा यांच्या माध्यमातून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह २०२४च्या अनुषंगाने सदर महोत्सवात रस्ता सुरक्षेच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि भारतीय रस्त्यांवरील अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी उपयायोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम राबविला.  

श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या वतीने सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रातील होतकरू, तरुण, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन गेली २७ वर्षे केले जात आहे. संस्थेने राबविलेल्या अशा उपक्रमातून आपल्या सुप्त कला-गुणांना वाव देण्याची संधी अशा कलाकारांना मिळत असते. आतापर्यंत या व्यासपीठावर तयार झालेले अनेक कलाकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करीत आहेत असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Previous Post

सावित्रींबाईचे विचार आगामी पिढीत रुजविण्यासाठी शिबिरे उपयुक्त : रामदास वऱ्हाडी

Next Post

उदंड झाले बिबटे

Next Post
उदंड झाले बिबटे

उदंड झाले बिबटे

नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

एमआयएमचे हाजी शाहनवाझ खान लवकरच कोकण दौऱ्यावर

लोकनेते रामशेठ ठाकूर राज्यस्तरीय ‘समाज दर्पण’ पुरस्काराने सन्मानित 

लोकनेते रामशेठ ठाकूर राज्यस्तरीय ‘समाज दर्पण’ पुरस्काराने सन्मानित 

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com