• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 22, 2024

सुरक्षा रक्षकांना तीन महिन्याचे थकीत वेतन तातडीने द्या : रविंद्र सावंत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

नवी मुंबई : : महापालिकेतील बहूउद्देशीय कामगार या संवर्गातील शाळेतील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना तीन महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्याची मागणी कामगार नेते व इंटक संलग्न असलेल्या महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात बहूउद्देशीय कामगार या संवर्गात महापालिकेत शाळेमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणारे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. या कामगारांना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२३ या तीन महिन्याचे वेतन आता जानेवारी महिन्याची २२ तारीख उलटली तरी आजपर्यत मिळालेले नाही.
तीन महिने वेतन नसल्याने या सुरक्षा रक्षक कामगारांना व त्यांच्या परिवाराला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामगार कर्ज काढून दिवस ढकलत असल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. सधन महापालिका आपल्या शाळेच्या सुरक्षा रक्षकांना तीन महिने वेतन देवू शकत नाही हे निर्माण झालेले चित्र नक्कीच भूषणावह नाही. या सुरक्षा रक्षक कामगारांचा पीएफ भरण्यात आलेला नाही व त्यांना ईएसआयही देण्यात येत नाही. उद्या ठेकेदार कंत्राट सोडून पळून गेला तर या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन कोण देणार? पीएफ कोण भरणार? हेही प्रश्न नव्याने निर्माण होणार आहेत. या ठेकेदारांकडून या सुरक्षा रक्षकांच्या वेतन विलंबाबत गेल्या अनेक वर्षापासून गोंधळ सुरू असून संबंधित कामगारांचे आर्थिक शोषण केले जात आहे. या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून महापालिका प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करणे आवश्यक असल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे थकीत वेतनाबाबत संबंधित ठेकेदार कठोर प्रशासकीय कारवाई होणे आवश्यक आहे. या पालिका शाळेवरील सुरक्षा रक्षक कामगारांना त्यांचे तीन महिन्याचे थकीत वेतन देण्याचे त्यांचा पीएफ तात्काळ भरणेविषयी आपण संबंधितांना तातडीने निर्देश देवून महापालिका शाळेवरील सुरक्षा रक्षक कामगारांना न्याय मिळवून द्यावा. आज हा ठेकेदार मला काम नको असे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगत आहे, पण या कर्मचाऱ्यांचे सर्व थकीत वेतन, पीएफ सर्व भरल्याच्या पावत्या व इतर हिशोब दिल्याशिवाय कार्यमुक्त करु नये. या ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे थकीत वेतन असताना व आता चौथा महिना भरत आलेला असताना काम नको म्हणणे कामगारांवर अन्यायकारक आहे. कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनप्रकरणी या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.

Previous Post

चलो अवधपुरी, अपने रामलल्ला पधार रहे है।

Next Post

एमआयडीसीतील रोजगारात भुमीपुत्रांसह अल्पसंख्यांकांना गुणवत्तेवर प्राधान्य द्या : हाजी शाहनवाझ खान

Next Post
नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

एमआयडीसीतील रोजगारात भुमीपुत्रांसह अल्पसंख्यांकांना गुणवत्तेवर प्राधान्य द्या : हाजी शाहनवाझ खान

विना भूसंपादन शेतातील अतिक्रमणावर पंतप्रधानाकडे सोशल मीडियावर दाद मागताना जुन्नरचा मराठा समाजाचा शेतकरी

विना भूसंपादन शेतातील अतिक्रमणावर पंतप्रधानाकडे सोशल मीडियावर दाद मागताना जुन्नरचा मराठा समाजाचा शेतकरी

सामाजिक कामांतून कॉंग्रेसचा प्रजासत्ताक दिन साजरा

सामाजिक कामांतून कॉंग्रेसचा प्रजासत्ताक दिन साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com