• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 9, 2023

नवी मुंबईत रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबईत रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात रविवार १० डिसेंबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये ० ते ५ वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीकरण करण्यात येणार असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले आहे.

भारत देश पोलिओमुक्त आहे. परंतू काही देशांमध्ये अद्याप पोलिओ असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो यासाठी पल्स पोलिओ मोहीम राबविली जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ० ते ५ वर्ष वयोगटामधल्या अपेक्षित ८९१९७ बालकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेऊन मोहीमेचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता २४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ६०५ स्थायी, ९३ ट्रांझिट व २७ फिरते मोबाईल असे एकूण ७२५ बुथ कार्यरत असणार आहेत. या लसीकरण मोहिमेसाठी मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा वर्दळीच्या ठिकाणी ट्रांझिट व फिरती मोबाईल पथके तयार करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या अध्यक्षेतखाली सिटी टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली असून नियोजनाचा आढावा घेण्यात आला. तसेच पल्स पोलीओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्याकरिता वैद्यकीय अधिकारी, एनएम, एलएचव्ही, एएनएम, आशा व स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या मोहीमेकरीता महापालिका कार्यक्षेत्रात जनजागृतीपर पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले आहेत. पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेच्या दिवशी बूथवरील स्वयंसेवकांनी बाळाला हाताचा स्पर्श होणार नाही याची काळजी घेणे. तसेच डाव्या कंरगळीवर पेनने खूण करताना बाळाचा हात न पकडणे याबाबात प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

या पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत ज्या बालकांनी १० डिसेंबर २०२३ रोजी डोस घेतला नसेल त्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ८८८ टिमद्वारे गृहभेटीमध्ये पुढील ५ दिवस‍ घरोघरी जाऊन डोस देण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक टिमचे कार्यक्षेत्रनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

तरी पालकांनी पोलिओवर मात करण्यासाठी देशव्यापी मोहिमेत सहभागी व्हावे आणि आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

वाशी सेक्टर १७ मधील वाहतुक कोंडीवरून एमआयएम आक्रमक

Next Post

काँग्रेसचा सोमवारी ११ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

Next Post
अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी : नाना पटोले

काँग्रेसचा सोमवारी ११ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

इमारत पुनर्बांधणीसाठी जनजागृतीस्तव महापालिकेने स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करा : हाजी शाहनवाझ खान

नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

नवी मुंबईतील गावठाण विस्तार योजनेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करा : हाजी शाहनवाझ खान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com