• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 2, 2023

पिंपळगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा : संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
पिंपळगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा : संदीप खांडगेपाटील

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : न्यायालयीन निकालाबाबत ग्रामस्थांना व प्रसिद्धी माध्यमांना चुकीची माहिती देवून सशुल्क पोलीसी पाठबळावर दोघा वयोवृद्ध शेतकरी परिवाराच्या जमिनीवर अतिक्रमणाची डागडूजी करणाऱ्या पिपळगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या वर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे पोलिस महासंचालक आणि पुण्याचे एसपी यांच्याकडे २ जुलै रोजी एका लेखी निवेदनातून केली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव – जुन्नर रोडवरील दोघा वयोवृद्ध शेतकरी भावाच्या जमिनीवर विना भूसंपादन करता थेट २६ गुंठे जागेतील अतिक्रमणावर पोलीसी पाठबळावर डागडूजी करत न्यायालयीन केसबाबत जनतेला व प्रसिद्धीमाध्यमांना केस जिंकल्याची खोटी माहिती देणाऱ्या पिंपळगावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

संदीप खांडगेपाटील यांनी संदर्भात  ५ जुन २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे पोलिस महासंचालक आणि पुण्याचे एसपी यांना यापूर्वीही  निवेदन सादर केले होते. शेतकऱ्यांचे कैवारी असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्येचे गांभीर्य पाहून तात्काळ  ते निवेदन Shri Rajesh Kumar <sec.rdd@maharashtra.gov.in>,
Sujata Saunik acs.home@maharashtra.gov.in यांना कार्यवाहीसाठी फॉरवर्डही केले होते. त्याबाबत काय कार्यवाही झाली आहे, याचीही माहिती संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून मागितली आहे.

पिंपळगाव-जुन्नर रोडवर उत्तम विष्णू खांडगे (वय वर्ष ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्ष ७१) या दोन भावांची पाच एकर जमिन आहे. या शेतातील तब्बल २६ गुंठे जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. याबाबत हे दोघे वयोवृद्ध भाऊ प्रशासकीय पातळीवर शेताचे भूसंपादन झालेले नसताना व एक रूपयाचाही मोबदला आजतागायत मिळालेला नसताना अतिक्रमण विस्तारत चालले आहे व त्यावर झुंडशाहीच्या बळावर पोलिसी पाठबळावर खतपाणी घातले जात आहे. याबाबत न्यायालयात सुनावणीही सुरु आहे. हे दोघे वयोवृद्ध शेतकरी भाऊ यासंदर्भातील कोणतीही न्यायालयीन केस हारलेले नाहीत. न्यायालयात ६ डिसेंबर २०२२, ३ जानेवारी २०२३, १७ जानेवारी २०२३, १७ फेब्रुवारी २०२३, १४ मार्च २०२३, २६ एप्रिल २०२३, ३ मे २०२३, ६ मे २०२३, ०१ जुलै २०२३ आणि अशा याप्रकरणी सुनावण्या झाल्या असून न्यायालयाने आगामी तारीख १७ जुलै २०२३ दिलेली असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

भूंपसादन झालेले नसताना वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतातील तब्बल २६ गुंठे जागेवर अतिक्रमण झालेले आहे. या शेतकऱ्यांना व्यवस्थित चालता येत नाही. वयोमानानुसार चालताना तोल जातो. दोन्ही शेतकऱ्यांना व त्यांच्या पत्नींना अनेक आजार आहेत.  ३० मे रोजी जिल्हा परिषद अधिकारी, पिंपळगावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य थेट जेसीपी घेवून आले. हे अतिक्रमण याच दोघा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतीत झालेले असून प्रशासनाने या जमिनीचे कधीही भूसंपादन केलेले नाही व या दोन शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता २०१३-१४ मध्येही दडपशाही व झुंडशाहीच्या बळावर अतिक्रमणाची डागडूजी केली व आजही ३० मेपासून आगामी काही दिवस रोजी जिल्हा परिषद अधिकारी, पिंपळगावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य थेट जेसीपी घेवून अतिक्रमण झालेल्या विनाभूसंपादीत जागेवर डागडूजी (डांबरीकरण) केले आहे. एका ७७ वर्षाच्या शेतकऱ्याला व त्याच्या ७१ वर्षाच्या बायकोसाठी चार दिवस या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीचा निधी खर्च करून नारायणगाव पोलीस स्टेशनचा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. हा वयोवृद्ध शेतकरी व त्याची बायको अतिरेकी अथवा नक्षलवादी आहे काय? असा संतप्त सवाल संदीप खांडगेपाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला आहे.

जिल्हा परिषद अधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य आम्ही न्यायालयात केस जिंकलो आहोत, खांडगे कंपनी केस हारली असे धडधडीत पोलिसांसमोर व प्रसिद्धीमाध्यमांसमोर व ग्रामस्थांसमोर असत्य बोलत होते. त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिले. स्वत:चे आमच्या शेतातील अतिक्रमणावर फोटोसेशनही केले. न्यायालयीन सुनावणी सुरू असताना केस हारल्याचे धडधडीत असत्य वक्तव्य करून न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत चुकीची दिशाभूल करणाऱ्या पिंपळगावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा. दोघा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या जमिनीवर वर्षानुवर्षे भूसंपादन न करता एक पैसाचाही मोबदला न देता अतिक्रमण सातत्याने करण्याचे व अतिक्रमण विस्तारण्याचे धाडस या गावपुढाऱ्यांकडून सुरू आहे. आमच्या गावातील एक घटक मंत्रालयात असल्याने त्या ओळखीच्या बळावर तो ग्रामस्थांना अतिक्रमणाला साथ देत खतपाणी घालत आहे. आम्ही दोन शेतकरी भाऊ व परिवार संघर्ष करत आहे. न्यायालयीन सुनावणी सुरू असताना धडधडीतपणे बेमुलाम असत्य माहिती ग्रामस्थ व प्रसिद्धीमाध्यमांना देणाऱ्या पिंपळगावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून आम्हाला याप्रकरणी न्याय द्यावा. आम्ही पुरोगामी महाराष्ट्रात राहतोय की चंबळच्या खोऱ्यात? आमच्या शेतात दिवसाढवळ्या न्यायालयीन प्रक्रियेची खोटी माहिती देणाऱ्या पिंपळगावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व मंत्रालयात काम करून त्या ओळखीच्या बळावर आमच्या परिवाराची मुस्कटदाबी करणाऱ्या घटकापासून आमच्या परिवाराच्या जीवाला धोका आहे. आमचे दोन्ही परिवार कमालीच्या मानसिक दबावाखाली वावरत असून उद्या कोणाचा मानसिक धक्क्याने मृत्यू झाल्यास त्यास हेच घटक जबाबदार राहतील, याची आपण नोंद घ्यावी. साहेब, आमच्या परिवाराला न्याय हवाय, अशी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात केली आहे.

मुळातच या दोघा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या जमिनीत आजही शासनाने भूसंपादन केलेले नाही. मोबदला कोणताही मिळालेला नाही. गावात ये-जा करण्यासाठी अन्य शासकीय रस्ते उपलब्ध असतानाही या शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केले जात आहे. या दोघा शेतकऱी परिवाराच्या बंदोबस्तासाठी अतिक्रमाची डागडूजी करताना चार दिवस पोलिस बंदोबस्त नारायणगाव पोलिस स्टेशनला पैसे देवून ठेवण्यात आला.  त्यामुळे हे बाधित शेतकरी परिवार आज कमालीच्या दहशतीखाली वावरत आहे. उद्या या परिवाराच्या जीवाला काही दगाफटका झाल्यास त्यास सर्वस्वी पिंपळगावचे सरपंच आणि सर्वच ग्रामपंचायत सदस्य आणि मंत्रालयीन पातलीवरून आपल्या पदाचा गैरवापर करून ओळखीच्या बळावर या शेताच्या अतिक्रमणात महत्वाची भूमिका बजविणारे घटकच जबाबदार असतील, याची आपण नोंद घ्यावी. गावात अन्य तीन शासकीय रस्ते आहेत, ग्रामस्थांना नारायणगाव, घोडेगाव, जुन्नरला जाण्यासाठी कोणतीही गैरसोय नसताना या वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या जमिनीवर भूसंपादन नसताना ग्रामपंचायतीचे कारभारी पोलीसी बळ घेवून वारंवार डागडूजी करत आहेत. आपण याप्रकरणी भूसंपादन नसलेल्या व न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही खोटी माहिती देवून ग्रामस्थांची दिशाभूल करणाऱ्या पिंपळगावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी आणि हे अतिक्रमण काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत. मुळातच सरपंचाच्या घराजवळून जुन्नरला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे व शासकीय कागदोपत्री त्या रस्त्याची नोंद असताना सरपंचाने त्या रस्त्याचे काम सुरू करून वहिवाट करणे आवश्यक आहे आणि दोन शेतकरी परिवाराच्या शेतावर अतिक्रमण करण्यास मंत्रालयीन पातळीवरून दबाव आणणाऱ्या घटकांनी त्या रस्त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असताना सर्व मिळून आज दोघा शेतकरी परिवाराला मृत्यूच्या दिशेने घेवून जात आहे. या दोन वयोवृद्ध शेतकऱ्यांना आपण लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

Previous Post

पिंपळगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा : संदीप खांडगेपाटील

Next Post

पदपथावरील खड्ड्याची तात्काळ डागडूजी करा : पांडुरंग आमले

Next Post
पदपथावरील खड्ड्याची तात्काळ डागडूजी करा : पांडुरंग आमले

पदपथावरील खड्ड्याची तात्काळ डागडूजी करा : पांडुरंग आमले

नेरूळ सेक्टर १८ मध्ये आरोग्य उपकेंद्र सुरु करा : सौ. रुपाली भगत

प्रभाग ९६ मधील रहीवाशांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करा : सौ. रूपाली किस्मत भगत

जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

नेरूळ, जुईनगरमधील रहीवाशांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करा : विद्या भांडेकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com