• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 28, 2023

दिघा रेल्वे स्थानकाचे लवकरच उद्घाटन होणार, संजीव नाईकांच्या मागणीला यश

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
दिघा रेल्वे स्थानकाचे लवकरच उद्घाटन होणार, संजीव नाईकांच्या मागणीला यश

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

 नवी मुंबई : सेंट्रल हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून दिघा रेल्वे स्थानकाचे लवकरच उद्घाटन होणार आहे.  माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. दिघा रेल्वे स्थानकातील सर्व कामे पूर्ण झाली असून  हे स्थानक प्रवाशांसाठी लवकरात लवकर खुले करण्याची मागणी केली. त्यावर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर लवकरच दिघा स्थानकाचे उद्घाटन करण्यात येईल अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी डॉक्टर संजीव नाईक यांना दिली आहे. डॉक्टर संजीव नाईक यांच्या मागणीनुसार नवीन दिघा स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे.

लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी दिघा रेल्वे स्थानकाची २४ फेब्रुवारी २०२३ रोजी रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक यांच्या समवेत पाहणी करून कामाचा आढावा घेतला होता. याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, दिघा येथील स्थानिक नगरसेवक नवीन गवते उपस्थित होते.  लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी यावेळी महत्त्वाच्या सूचना स्थानकाच्या कामासंदर्भात केल्या होत्या. या पाहणी दौऱ्यानंतर  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या समवेत लोकनेते आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांची ३ मार्च २०२३ रोजी बैठक झाली होती.  या बैठकीमध्ये दिघा स्थानकाचे उर्वरित काम तत्परतेने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने डॉक्टर संजीव नाईक यांनी  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे १६ मार्च २०२३ रोजी भेट घेतली.  दिघा स्थानकातील जवळजवळ सर्व अपूर्ण कामे पूर्ण झाली असून हे स्थानक प्रवाशांच्या सेवेत खुले करण्याची मागणी डॉक्टर नाईक यांनी केली. रेल्वे राज्यमंत्री  दानवे यांनी यासंदर्भात लगेचच वरिष्ठ रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून ते ६ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे हे अधिवेशन संपतात दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात येईल अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी दिली आहे.

Previous Post

फेक कॉलपासून महिलांनी सावध राहावे

Next Post

शहराच्या आणि नवी मुंबईकरांच्या हितासाठी नाईक परिवाराने जनसुनावणीत मांडली लोकहितैषी भूमिका

Next Post
शहराच्या आणि नवी मुंबईकरांच्या हितासाठी नाईक परिवाराने जनसुनावणीत मांडली लोकहितैषी भूमिका

शहराच्या आणि नवी मुंबईकरांच्या हितासाठी नाईक परिवाराने जनसुनावणीत मांडली लोकहितैषी भूमिका

सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

मारुती पन्हाळकर क्रिडांगणात ओपन जीम सुरु करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई मनपाच्या मालमत्ता कर विभागाची गरुडभरारी

नवी मुंबई मनपाच्या मालमत्ता कर विभागाची गरुडभरारी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com