• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 8, 2023

‘आमदारआई’ची भूमिका साकारणाऱ्या नमिता मुंदडांची सर्वत्र प्रशंसाच

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
‘आमदारआई’ची भूमिका साकारणाऱ्या नमिता मुंदडांची सर्वत्र प्रशंसाच

संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

 मुंबई : आज जागतिक महिला दिन असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रम घेऊन हा दिवस साजरा केला जात आहे. महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत. क्रीडा असो वा उद्योग, गृहिणी असो वा राजकारणी या सर्वच क्षेत्रात महिलांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचा समावेश लक्षणीय आहे. त्यात एकाचवेळी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या या महिला आमदारांचे कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. 

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू असून आजच्या दिवशी आमदार नमिता मुंदडा यांनी त्यांच्या २ महिन्याच्या बाळासह विधान भवनात हजेरी लावली. आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या की, आज मला आनंद होतोय, पहिल्यांदाच मी माझ्या २ महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनात माझे प्रश्न मांडायला उपस्थित आहे. विधानसभा अध्यक्षांनी पुढाकार घेत यंदा आम्हाला हिरकणी कक्ष उपलब्ध करून दिला. हे माझे दुसरे बाळ आहे. याआधी पहिल्या बाळाला घेऊन मी विधानसभेत आले होते. परंतु त्यावेळी हिरकणी कक्ष उपलब्ध नव्हता अशी खंत त्यांनी मांडली. 

तसेच विधानभवनात हिरकणी कक्ष उभारला हे सकारात्मक पाऊल आहे. त्याचसोबत महिला दिनानिमित्त सगळ्या लक्षवेधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला त्याचा आनंद आहे. ही परंपरा यापुढेही चालूच राहू दे. प्रत्येक अधिवेशनात महिलांसाठी १-२ दिवस राखीव ठेवण्यात यावा. हिरकणी कक्ष यावा यासाठी सातत्याने मी पाठपुरावा केला. अनेक महिला आमदारांसाठी हा उपयुक्त कक्ष आहे असं आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार सरोज अहिरे यांनीही त्यांच्या ५ महिन्याच्या बाळाला कडेवर घेऊन विधानभवनात दाखल झाल्या होत्या. नागपूरच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात अडीच महिने वयाच्या त्यांच्या बाळासाठी (प्रशंसक) हिरकणी कक्ष उभारलेला होता. यावेळी मुंबईच्या अधिवेशनातही तसाच कक्ष असावा, असे पत्र त्यांनी चार दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानुसार कक्षाची व्यवस्था केली होती पण सासू आणि बाळासह सरोज अहिरे त्या कक्षात गेल्या तेव्हा तेथील दुरावस्था पाहून त्या व्यथित झाल्या. त्यानंतर तातडीने हिरकणी कक्षात सर्व सोयीसुविधा पुरवण्यात आल्या. 

Previous Post

शेतकऱ्यांच्या विषयावर राजकारण करू नका : देवेंद्र फडणवीस

Next Post

कॉंग्रेसच्या वतीने नेरूळमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

Next Post
कॉंग्रेसच्या वतीने नेरूळमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

कॉंग्रेसच्या वतीने नेरूळमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई महापालिका करंडक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेला उत्साहात सुरुवात

नवी मुंबई महापालिका करंडक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेला उत्साहात सुरुवात

साहित्यिक बाबा भांड यांचे महाराजा सयाजीराव गायकवाड जयंतीदिनी उद्या व्याख्यान

साहित्यिक बाबा भांड यांचे महाराजा सयाजीराव गायकवाड जयंतीदिनी उद्या व्याख्यान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com