• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 21, 2023

घणसोलीत शनिवार, रविवार रंगणार महापालिका चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
घणसोलीत शनिवार, रविवार रंगणार महापालिका चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : विविध खेळांमधील प्रावीण्यप्राप्त नवी मुंबईकर क्रीडापटूंना आपली अंगभूत गुणवत्ता सिद्ध करता यावी तसेच त्यांना जिल्हा व राज्यातील उत्तम खेळाडूंचा खेळ अनुभवता यावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.

यामधील एक महत्वाच्या अशा कुस्तीसारख्या देशी खेळाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने २५ व २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सेक्टर ७, घणसोली येथे डी मार्ट च्या मागे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ७६ व १०५ या शाळेच्या मैदानावर ‘नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे.

शनिवार दि. २५ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ४ वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ७.३० वाजता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे .

या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर ७४ ते १०० किलो वजनी गटाकरिता रु. १ लाख रकमेचे प्रथम पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. त्याचप्रमाणे अनुक्रमे ६० हजार, ४० हजार व ३० हजार अशा रकमेची द्वितीय, तृतीय व चतुर्थ पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.

५५ ते ६५ किलो राज्यस्तरीय वजनी गटात प्रथम क्रमांक रु. २१ हजार तसेच द्वितीय क्रमांक रु. ११ हजार, तृतीय क्रमांक रु. ७ हजार आणि चतुर्थ क्रमांक रुपये ५ हजार अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.

राज्यस्तरीय ६५ ते ७३ किलो वजनी गटात रुपये २५ हजार रकमेचे पहिले पारितोषिक आणि रू ११ हजार, रु ७ हजार व रुपये ५ हजार अशा रकमेची द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिके असणार आहेत.

५५ ते ६० किलो कोकण विभागीय स्तर गटात रुपये ११ हजार रकमेचे प्रथम, रु ७ हजार रकमेचे द्वितीय, रु. ५ हजार रकमेचे तृतीय आणि रु. ३ हजार रकमेचे चतुर्थ पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. ५५ ते ६५ किलो नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र स्तर वजनी गटात रु ११ हजार प्रथम, रु ७ हजार द्वितीय, रु ५ हजार तृतीय व रु ३ हजार अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. ४० ते ५० किलो वजनी गटात नमुंमपा क्षेत्र स्तरावर रु. ५ हजार, रू. ३ हजार, रु २ हजार व रु. १ हजार अशी पारितोषिके वितरित केली जाणार आहेत.

त्याचप्रमाणे महिलांसाठी देखील विशेष कुस्ती स्पर्धा होत असून त्यामध्ये ५५ ते ६५ किलो महिला वजनी गटात राज्यस्तरीय स्पर्धेत रुपये ११ हजार रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक रु ७ हजार, तृतीय पारितोषिक रु ५ हजार व चतुर्थ पारितोषिक रुपये ३ हजार प्रदान केले जाणार आहे. महिला गटामध्ये कोकण विभागीय स्तरावरील ५० ते ५५ किलो वजनी गटात रू ७ हजार प्रथम, रु ५ हजार द्वितीय, रू ३ हजार तृतीय आणि रु २ हजार चतुर्थ रक्कमेचे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. तरी नवी मुंबईतील कुस्तीगिरांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होऊन आपल्या क्रीडा गुणांना उपलब्ध करून दिलेल्या हक्काच्या व्यासपीठाचा उपयोग करून घ्यावा तसेच कुस्तीप्रेमींनीही याप्रसंगी उपस्थित राहून राज्यातील नामांकित कुस्तीगिरांच्या खेळाचा थरार अनुभवावा असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत पंकज भुजबळांच्या दोन्ही मुलींना सुवर्ण पदक

Next Post

राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोलीतील नवजात शिशू विभाग नवजात बालकांसाठी वरदान

Next Post
राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोलीतील नवजात शिशू विभाग नवजात बालकांसाठी वरदान

राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोलीतील नवजात शिशू विभाग नवजात बालकांसाठी वरदान

जुईनगर सेक्टर २४ मधील ओंकार सोसायटीलगतच्या विद्युत उपकेंद्र आवाराची सफाई करा : रविंद्र सावंत

जुईनगर सेक्टर २४ मधील ओंकार सोसायटीलगतच्या विद्युत उपकेंद्र आवाराची सफाई करा : रविंद्र सावंत

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

शहराला बकालपणा आणणाऱ्या विद्युत डीपींच्या डागडूजीसाठी महावितरणला निर्देश द्या : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com