• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 2, 2023

प्रभाग ३० मध्ये रात्रीच्या वेळी धूरफवारणी करा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३

नवी मुंबई :  सानपाडा नोडमधील डासांचा उद्रेक समस्या संपुष्ठात आणण्यासाठी प्रभाग ३० गृहनिर्माण सोसायटींच्या अंर्तगत भागात रात्रीच्या वेळी नियमित धूरफवारणी करण्याची लेखी मागणी समाजसेवक व सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.

सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. प्रभाग ३० मध्ये गेल्या काही दिवसांपासून डासांच्या उपद्रवाने स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले आहेत.  डासांमुळे रहीवाशांना सांयकाळनंतर सोसायटीच्या आवारात वावरता येत नाही. दारे-खिडक्या बंद ठेवून घरात बसावे लागत आहे. डासांमुळे बाराही महिने या प्रभागात साथीच्या आजाराने ग्रस्त रुग्ण पहावयास मिळतात. सानपाडा नोडमधील रहीवाशांना दिलासा देण्यासाठी प्रभाग ३० मध्ये व्यापक प्रमाणावर धुरीकरण अभियान राबविणे आवश्यक आहे. केवळ रस्त्यावरून धुरीकरण न करता प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागात तसेच पालिका उद्यानामध्ये धुरीकरण करण्यात यावे. गटारांमध्ये जंतुनाशके टाकण्यात यावी. प्रभागातील डासांच्या समस्येचे निर्मूलन करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी निवेदनातून केली आहे.

प्रभाग ३० मधील रहीवाशांनी आमच्या भाजप कार्यालयात येवून केलेल्या तक्रारींनुसार, डासांचा प्रामुख्याने त्रास हा रात्रीच्या वेळीच होत असल्याने धुरीकरण मोहीम रात्रीच्या वेळी राबविल्यास डासांची समस्या संपुष्ठात येईल. डासांच्या त्रासाने रहीवाशी त्रस्त झाले आहेत. ही समस्या संपुष्ठात न आल्यास परिसरात साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती पांडुरंग आमले यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.

समस्येचे गांभीर्य, साथीच्या आजाराचे अस्तित्व आणि रहीवाशांना होणारा त्रास पाहता संबंधितांना प्रभाग ३० मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात व उद्यानामध्ये व्यापक प्रमाणावर समस्येचे निर्मूलन होईपर्यत रात्रीच्या वेळी धुरीकरण अभियान राबविण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.

Previous Post

कोविड काळाने आपल्याला खूप काही शिकविले : आ. मंदाताई म्हात्रे

Next Post

महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने मानले पालिका आयुक्तांचे आभार

Next Post
महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने मानले पालिका आयुक्तांचे आभार

महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने मानले पालिका आयुक्तांचे आभार

सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

नेरूळ सेक्टर सहा व कुकशेत गावातील भाजप कार्यालयात शिष्यवृत्तीचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी सुविधा उपलब्ध

सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

नेरूळ सेक्टर ६ परिसरातील पाणीसमस्येवर तातडीने तोडगा काढा : सौ. सुजाताताई पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com