• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 23, 2022

सिडकोच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ करीता ऑनलाइन अर्ज नोंदणीस ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सिडकोच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ करीता ऑनलाइन अर्ज नोंदणीस ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ या गृहनिर्माण योजनेस मिळत असलेल्या नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि नागरिकांना केलेल्या मागणीमुळे सदर योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यास ६ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या योजनेकरिता अर्ज नोंदणी करण्यास २२ डिसेंबर २०२२ ही अंतिम तारीख होती. परंतु अधिकाधिक नागरिकांना योजनेकरिता अर्ज करता येणे शक्य होऊन, त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. या अनुषंगाने अनामत रक्कम व शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे.

सिडकोतर्फे या वर्षीच्या दिवाळीच्या शुभू मुहूर्तावर २४ ऑक्टोबर २०२२ रोजी महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ अंतर्गत नवी मुंबईच्या उलवे नोडमधील बामणडोंगरी रेल्वे स्थानक, खारकोपर पूर्व २ए, खारकोपर पूर्व २बी आणि खारकोपर पूर्व २पी येथे ७,८४९ सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या योजनेद्वारे झपाट्याने विकसित होत असलेल्या व परिवहनदृष्ट्या समृद्ध असलेल्या उलवे नोडमध्ये परवडणाऱ्या दरातील घर घेण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे.

या योजनेतील गृहसंकुलांना नेरूळ-उरण उपनगरीय रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी व खारकोपर रेल्वे स्थानकांसह महामार्ग, प्रस्तावित एमटीएचएल महामार्ग यांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. तसेच सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या गृहसंकुलांपासून नजीकच्या अंतरावर असल्याने उलवे नोडला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.

सुधारित वेळापत्रकाप्रमाणे महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ करीता ऑनलाइन अर्ज नोंदणी ६ जानेवारी २०२३ पर्यंत करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज ७ जानेवारी २०२३ पर्यंत सादर करता येणार आहेत. ऑनलाइन शुल्क भरणा ७ जानेवारी २०२३ पर्यंत करता येणार आहे. स्वीकृत अर्जदारांची प्रारुप यादी १४ जानेवारी २०२३ रोजी तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी १८ जानेवारी २०२३ रोजी सिडकोच्या https://lottery.cidcoindia.com/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. योजनेची संगणकीय सोडत ३ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडणार आहे.

Previous Post

पालिकेच्या सारसोळे शाळेला कायमस्वरुपी मुख्याध्यापक द्या : महादेव पवार

Next Post

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत राज्य सरकारने धोरण स्पष्ट करावे : बाळासाहेब थोरात

Next Post
कमी पटसंख्येच्या शाळांबाबत राज्य सरकारने धोरण स्पष्ट करावे : बाळासाहेब थोरात

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत राज्य सरकारने धोरण स्पष्ट करावे : बाळासाहेब थोरात

जांभवडे शिवाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

जांभवडे शिवाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

परिवहन कर्मचाऱ्यांना कोविड कालावधीतील कार्याबाबत विशेष भत्ता अदा करा : रविंद्र सावंत

कोव्हिड महामारीच्या संभाव्य पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : रविंद्र सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com