• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 3, 2022

महापालिकेच्या ४ रूग्णालयातील एनआयसीयू बेडसमध्ये मोठी वाढ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापालिकेच्या ४ रूग्णालयातील एनआयसीयू बेडसमध्ये मोठी वाढ

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम वैदयकीय सेवासुविधा पुरविण्यात येत आहेत. यादृष्टीने रूग्णालयांमध्ये नवजात अतिदक्षता विभाग आणि लेबर वार्ड संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.

नवी मुंबई महापालिकेची वाशी, नेरूळ व ऐरोली येथे सार्वजनिक रूग्णालये कार्यरत असून बेलापूर येथे माता बाल रूग्णालय कार्यरत आहे. याठिकाणी नवजात अतिदक्षता विभाग व लेबर वार्डची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेडसच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे.

यामध्ये सार्वजनिक रूग्णालय वाशी येथील ९ एनआयसीयू बेडसमध्ये भर घालत २४ बेडस माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ येथील ९ एनआयसीयू बेडसची संख्या वाढवून २४ बेडस, राजमाता जिजाऊ रूग्णालय ऐरोली येथील १० एनआयसीयू बेडसची संख्या वाढवून २२ बेडस तसेच माता बाल रूग्णालय बेलापूर येथील ४ एनआयसीयू बेडसची संख्या वाढवून १२ बेडस अशाप्रकारे आधीच्या एकूण ३२ एनआयसीयू बेडसमध्ये ५० बेडसची भरीव वाढ करीत सद्य:स्थितीत ८२ एनआयसीयू बेडस कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.

अशाप्रकारे नवजात अतिदक्षता विभाग व लेबर वार्डमधील बेडसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जास्तीत जास्त नवजात शिशूंवर उपचार करणे शक्य होत आहे.. नवजात अतिदक्षता विभागात वार्मरचा उपयोग हा प्रसुती कक्षात सुरूवातीच्या काळात नवीन जन्मलेल्या अर्भकाची काळजी घेण्यासाठी तसेच २८ दिवसांवरील कमी वजनाच्या बालकांसाठीसुध्दा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे फोटेथेरपी मशीन्सचा कावीळची लक्षणे असलेल्या नवजात शिशूंवर उपचार करण्यासाठी उपयोग होत आहे.

महापालिकेच्या सार्वजनिक रूग्णालयामध्ये मागील ४ महिन्यात २७६ नवजात शिशूंवर उपचार करण्यात आले आहेत. यातील १ कि.ग्रॅ. पेक्षा कमी वजनाच्या ३ आणि १ ते १.२ कि.ग्रॅ. वजनाच्या ९ अशा १२ नवजात शिशूंवर उपचार करून त्यांच्या वजनात वाढ करण्यात आली आहे. ह्दयाशी संबंधित आजार असलेल्या २ शिशूवर उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कमी दिवसांच्या ६० बाळावर उपचार करून त्यांना बरे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर विविध आजारांकरिता रूग्णालयात दाखल झालेल्या शिशूंवर उपचार करण्यात आलेले आहेत. या कार्यवाहीमध्ये वैद्यकिय अधिक्षक डॉ. उध्दव खिल्लारे, बालरोग तज्ज्ञ डॉ. माधवी इंगळे व प्राध्यापक डॉ. संध्या खडसे यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे.

महापालिकेच्या चार रूग्णालयांतील नवजात अतिदक्षता विभाग व लेबर वार्ड सुविधांमध्ये ५० बेडसची मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने तेथील आरोग्य सेवेचे सक्षमीकरण झाले असून यामुळे अधिक नागरिकांना वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होत आहे.

Previous Post

कोण पटकवणार बहुमानाचा अटल करंडक; महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला

Next Post

दिव्यांगत्व, स्वच्छतेविषयी वॉकेथॉनद्वारे व्यापक जनजागृती

Next Post
दिव्यांगत्व, स्वच्छतेविषयी वॉकेथॉनद्वारे व्यापक जनजागृती

दिव्यांगत्व, स्वच्छतेविषयी वॉकेथॉनद्वारे व्यापक जनजागृती

सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

बाजार समिती आवारातील पाचही मार्केटचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : पांडुरंग आमले

गोवर उद्रेकामुळे चिंता वाढली

गोवर उद्रेकामुळे चिंता वाढली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com