• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 8, 2022

सफाई कर्मचाऱ्यांच्या परिवारासाठी दर महिन्याला मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करा : संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

नवी मुंबई : महापालिका प्रशासनातील सफाई कर्मचाऱ्यांच्या परिवारासाठी दर महिन्याला एक वेळ मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून वैद्यकीय तपासणी करून घेण्याची लेखी मागणी कामगार नेते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.

नवी मुंबई महापालिका प्रशासनात कंत्राटी तत्वावर सफाई कर्मचारी काम करत आहे. समान कामाला, समान वेतन ही घोषणा महापालिका प्रशासन सातत्याने करत असले तरी या सफाई कर्मचाऱ्यांना आजही तुटपुंज्या वेतनावरच काम करावे लागत आहे. याच कामगारांच्या परिश्रमामुळे, त्यांनी केलेल्या शहर स्वच्छतेमुळे नवी मुंबई शहराला नुकताच राज्यात प्रथम व देशात तिसऱ्या क्रमाकांचे पारितोषिक स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मिळालेले आहे. यापूर्वीही संत गाडगेबाबा स्वच्छ अभियानामध्ये राज्यात सलग दोन वेळा नवी मुंबई शहराला राज्यात दोन वेळा प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळालेले आहे.  सफाई कामगारांच्या परिश्रमामुळे महापालिका प्रशासनाला पुरस्कार मिळतात, पण ते पुरस्कार घ्यायला स्टेजवर सुटबुट घालून अधिकारी केंद्र व राज्य सरकार आयोजित कार्यक्रमात जातात. त्यांनी आयुष्यात कधी झाडू घेतला नाही, रस्ते-पदपथाची सफाई केली नाही, ते पुरस्कार घेतात  व ज्यांच्यामुळे पुरस्कार सातत्याने मिळतात, ते सफाई कामगार मात्र तुटपुंज्या वेतनात आजही रस्त्यावर झाडू मारत असल्याचे कामगार नेते संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

या कामगारांचा रस्ते, पदपथ सफाईमुळे दररोज धुळीशी, घाणीशी संबंध येत असतो. या सफाई कर्मचाऱ्यांची शेड ज्या ठिकाणी असते, तेथेही बकालपणा असतो. त्यामुळे त्यांना व त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना विविध आजार जडण्याची भीती आहे.  ज्यांच्यामुळे पुरस्कार मिळतात, त्यांची व त्यांच्या परिवाराची काळजी घेणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. हे सफाई कामगार आपली संपत्ती आहे. त्यांची व त्यांच्या परिवाराची काळजी पालिका प्रशासनाने घेतलीच पाहिजे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सफाई कर्मचारी व त्यांच्या परिवाराच्या आरोग्य रक्षणासाठी, त्यांच्या जिविताची काळजी घेण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्थानिक नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून महिन्यातून एक वेळ मोफत आरोग्य तपासणी करुन घ्यावी, यासाठी दर महिन्याला त्या त्या प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करावे. समस्येचे गांभीर्य व मागणीतील कळकळ पाहता आपण आरोग्य विभागाला  सफाई कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या परिवारासाठी दर महिन्याला एक वेळा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

Previous Post

मुख्यमंत्री महोदय, मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना न्याय द्या : संदीप खांडगेपाटील

Next Post

महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवा : रविंद्र सावंत

Next Post
महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवा : रविंद्र सावंत

महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवा : रविंद्र सावंत

सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

माथाडी कामगारांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

परिवहन कर्मचाऱ्यांना कोविड कालावधीतील कार्याबाबत विशेष भत्ता अदा करा : रविंद्र सावंत

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २७ हजार सानुग्रह अनुदान जाहीर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com