• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 28, 2022

कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी नवी मुंबई इंटकचे पालिका प्रशासनाला साकडे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
परिवहन कर्मचाऱ्यांना कोविड कालावधीतील कार्याबाबत विशेष भत्ता अदा करा : रविंद्र सावंत

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणारे कायम सेवेतील कर्मचारी अधिकारी, कंत्राटी कर्मचारी, ठोक मानधनावरील कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी यांना पालिका प्रशासनाने सानुग्रह अनुदान द्यावे यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाने व परिवहन उपक्रमाकडे लेखी पाठपुरावा सुरू केला आहे.

कोरोना महामारीत गेली दोन वर्षे हतबल झालेल्या व अर्थकारण बिघडलेल्या पालिकेच्या आस्थापनेतील सर्वच संवर्गातील कर्मचारी अधिकारी, कंत्राटी कर्मचारी, ठोक मानधनावरील कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान भरीव स्वरूपात देवून त्यांना आर्थिक दिलासा देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी लेखी स्वरूपात पालिका प्रशासनाकडे तसेच परिवहन उपक्रमाकडे स्वतंत्रपणे केली आहे.

महापालिका आयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनात पालिका आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपये सानुग्रह अनुदान तसेच महापालिका परिवहन उपक्रमातील व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांना दिलेल्या निवेदनात महापालिका परिवहन विभागातील ठोक मानधनावरील चालक, वाहक व अन्य कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.

महापालिका आर्थिक स्वरूपात सधन असून अंदाजपत्रकात महापालिकेने तशी भरीव तरतूदही केलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे राज्य व केंद्र पातळीवर नवी मुंबई महापालिकेला सातत्याने विविध पारितोषिकांचा वर्षावही होत आहे. त्यामुळे कोरोना महामारीमुळे अर्थकारण हतबल झालेल्या महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, ठोक आणि रोजंदारी तत्त्वावर काम करणारे कर्मचारी तसेच महापालिका परिवहन विभागातील ठोक मानधनावरील चालक, वाहक व अन्य कर्मचारी यांना घसघशीत सानुग्रह अनुदान देवून पालिकेने खऱ्या अर्थांने पालकत्व निभावण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

नेरूळ पश्चिम भागातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करा : संदीप खांडगेपाटील

Next Post

डेंग्यू, मलेरिया नियत्रंणासाठी प्रभाग ३४ मध्ये धुरीकरण अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

Next Post
नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

डेंग्यू, मलेरिया नियत्रंणासाठी प्रभाग ३४ मध्ये धुरीकरण अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर उत्साहात

महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर उत्साहात

सानपाड्यात रंगतेय भाजपच्या नवरात्रोत्सवाची धून

सानपाड्यात रंगतेय भाजपच्या नवरात्रोत्सवाची धून

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com