• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 31, 2022

रायफल शुटिंग खेळामध्ये नमुंमपा शाळांमधील विद्यार्थी चमकणार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
रायफल शुटिंग खेळामध्ये नमुंमपा शाळांमधील विद्यार्थी चमकणार

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com – व्हॉटसअप: ९८२००९६५७३

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून महानगरपालिका संचालित शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑलिंपिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळांचेही तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून ‘रायफल शुटिंग’ खेळाचे नमुंमपा शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महानगरपालिका क्रीडा विभागाच्या माध्यमातून या क्षेत्रातील अत्यंत नावाजलेल्या खेळाडू व अनुभवी प्रशिक्षक श्रीम.सुमा शिरुर यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

याकरिता महापालिका शाळांमधील मुलामुलींची यादी शिक्षण विभागाच्या वतीने मागविण्यात आलेली आहे. यामधील ८५ मुले व ५१ मुलींची पात्रता फेरीची निवड चाचणी  २२ व २३ जुलै २०२२ रोजी फादर ॲग्नल स्पोर्ट्स सेंटर येथील शुटिंग रेंजवर घेण्यात आली व निवड चाचणी मधून प्राथमिक फेरीमध्ये १४ मुले व १२ मुलींची निवड करण्यात आलेली आहे.

या निवड चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे रायफल शुटिंग खेळाबाबत केवळ बघून आणि वाचून असलेल्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच शुटिंग रेंजमध्ये / हातामध्ये रायफल घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत आनंदाची भावना दिसून आली. विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच रायफल हातात घेऊनसुध्दा टायमेटच्या जवळपास लक्ष्य साध्य करुन अंगभूत क्रीडागुणांमुळे १४ मुले व १२ मुलींनी त्यांच्यातील गुणवत्तेचे दर्शन घडवित दखल घेण्यास भाग पाडले.

यापुढील काळात या मुलामुलींच्या अंतिम निवड चाचणीअंती १३ विद्यार्थ्यांना रायफल शुटिंगचे पुढील तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठीचा संपूर्ण खर्च महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. रायफल शुटिंग सारख्या खेळामध्ये महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळण्याची संधी देण्यात आली असून आगामी काळात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर महानगरपालिकेचा नावलौकिक उंचावतील असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त करत या विद्यार्थ्यांना पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

Previous Post

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

Next Post

धर्मवीर आनंद दिघेंना खासदार राजन विचारेंचे पत्र…

Next Post
धर्मवीर आनंद दिघेंना खासदार राजन विचारेंचे पत्र…

धर्मवीर आनंद दिघेंना खासदार राजन विचारेंचे पत्र...

एलआयजी परिसरात कचरा संकलनासाठी दिवसातून दोन वेळा घंटागाड्या पाठवा : विद्या भांडेकर

दूषित, गढूळ पाण्याच्या समस्येचे निवारण करा :  विद्या भांडेकर

नेरुळ प्रभाग-९६ मध्ये भारतीय डाक विभाग अपघात विमा योजना शिबिर उत्साहात

नेरुळ प्रभाग-९६ मध्ये भारतीय डाक विभाग अपघात विमा योजना शिबिर उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com