• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 17, 2022

पुष्पक नगर नोडकरिता पूरक चटई क्षेत्र निर्देशांक ना-हरकत प्रमाणपत्र

adminbyadmin
in टॉप न्यूज, रायगड
0
कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांकरिता सिडकोची विशेष गृहनिर्माण योजना ,१५ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे, विमानतळ प्रकल्पबाधितांना पुष्पक नगर या पुनर्सवन आणि पुन:स्थापना क्षेत्रात वाटपित करण्यात आलेल्या भूखंडांकरिता पूरक चटई क्षेत्र निर्देशांकासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली आहे.

सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांकरिता सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असणारा पुष्पक नगर नोड विकसित करण्यात येत आहे. पुष्पक नगर नोडमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन आणि पुन:स्थापनेकरिता सिडकोकडून भूखंड वाटपित करण्यात आले आहेत.

पुष्पक नगरचा विकास हा नगर विकास विभागाने २.१२.२०२० पासून अंमलात आणलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार नियंत्रित होत आहे. युडीसीपीआरमधील तरतुदींनुसार सिडकोने मूळ १.५ चटई निर्देशांकाव्यतिरिक्त पूरक चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय केला आहे. आपल्या भूखंडांकरिता पूरक चटई क्षेत्र निर्देशांक ना-हरकत प्रमाणपत्रे जलद गतीने देण्यात यावीत, अशी विनंती विमानतळ प्रकल्पबाधितांनी सिडकोला केली होती.

या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देत सिडकोकडून पूरक चटई क्षेत्र निर्देशांकाकरिता ना-हरकत प्रमाणपत्रे प्रदान करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यानुसार, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी विभागाकडून विहित नमुना तयार करण्यात आला आहे. सिडकोच्या वित्त विभागाच्या मंजुरीनंतर, पूरक चटई क्षेत्र निर्देशांक ना-हरकत प्रमाणपत्राकरिता केलेल्या विहित नमुन्यातील अर्जांवर प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर अर्जदाराच्या मागणीचा विचार करून व्यवस्थापनाकडून त्याकरिता मंजुरी देण्यात येईल. संपूर्ण प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येईल. सिडकोतर्फे पूरक चटई क्षेत्र निर्देशांक ना-हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आल्यामुळे पुष्पक नगर नोडच्या विकासास गती मिळणार आहे.

 

Previous Post

शिवकालीन शस्त्र व नाणी प्रदर्शनाचे आयोजन

Next Post

राष्ट्रवादीचे  नवाब मलिक यापुढे राहणार नामधारी मंत्री

Next Post
राष्ट्रवादीचे  नवाब मलिक यापुढे राहणार नामधारी मंत्री

राष्ट्रवादीचे  नवाब मलिक यापुढे राहणार नामधारी मंत्री

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहामधील उद्यानातील खेळण्याची दुरूस्ती होणार कधी? : संदीप खांडगेपाटील

कंत्राटी कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत बोनस व ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याचे आयुक्तांचे निर्देश

महापालिकेच्या लांबणीवर पडलेल्या निवडणूका लोकसभा-विधानसभा निवडणूकीत नेतेमंडळींना महागात पडणार ?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com