• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 15, 2022

कोपरखैराणे सेक्टर २२-२३ मधील वाहतुक कोंडीवर ठोस तोडगा काढा : सुनिता हांडेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
कोपरखैराणे सेक्टर २२-२३ मधील वाहतुक कोंडीवर ठोस तोडगा काढा : सुनिता हांडेपाटील

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbialive.com@gmail.com

नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर २२-२३ मधील रहीवाशी वाहतुक कोंडीच्या समस्येचे व वाहनांच्या रस्त्यावर कोठेही मनमानी पार्किगमुळे त्रस्त झाले असून समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील गेल्या काही महिन्यापासून या वाहतुक कोंडीच्या व मनमानी पार्किगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून वाहतुक कोंडीवर व मनमानी पार्किगच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची त्यांच्याकडे मागणी केली.

कोपरखैराणे नोड येथील प्रभाग ४२ मधील सेक्टर २२ आणि २३ मध्ये आपण फेरफटका मारल्यास आपणास रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने पार्क केलेली पहावयास मिळतील. कोपरखैराणे सेक्टर २२ आणि २३ हा पूर्णपणे निवासी वसाहतीचा परिसर आहे. दोन्ही बाजूला वाहने उभी केली जात असल्याने वाहतुक कोंडीची समस्या गंभीर रूप धारण करू लागली आहे. दोन्ही बाजूला वाहने उभी राहील्याने पदपथ त्याआड झाकले जात आहे. त्यामुळे काही वर्षापूर्वी बेलापुरमध्ये वाहनांच्या आड महिला अत्याचाराची घटना घडली होती, तशी घटना येथेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय दोन्ही बाजूला वाहने उभी असल्याने अग्निशमनचे वाहन, रूग्णवाहिका, कचरा संकलन करणारी वाहने यांना अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. वाहतुक कोंडी कायम राहील्यास रूग्णवाहिकेतून जाणाऱ्या रूग्णाला उपचारासाठी विलंब होईल अथवा रूग्णापर्यत पोहोचण्यासाठी रूग्णवाहिकेला विलंब झाल्यास जिविताला धोका निर्माण होण्याची भीती आहे. याशिवाय अग्निशमनचे वाहन घटनास्थळी लवकर न पोहोचल्यास दुर्घटनेत वित्त व जिवितहानी अधिक होण्याची शक्यता आहे. दुतर्फा पार्किगमुळे स्थानिक रहीवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या समस्येवर पालिका प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढणे अपेक्षित आहे. यावर आपण पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी नो पार्किग तर काही ठिकाणी समविषम पार्किग योजना लागू करावी. या समस्या निवारणासाठी आपणास यापूर्वीही २० ऑगस्ट २०२१ रोजी तक्रारपत्र सादर केले होते. तसेच योजना लागू झाल्यावरही मनपा फलकांवरील सूचनांचे कोणी पालन करत नसेल तर टोईंग करून वाहने उचलून न्यावीत. प्रभागात रस्त्यावरील वाहन पार्किगची समस्या वाहतुक कोंडीला, परिसराच्या बकालपणाला खतपाणी घालत असल्याने पालिका प्रशासनाने या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून स्थानिक रहीवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

कोपरखैराणे सेक्टर २२-२३ मधील वाहतुक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ऑगस्ट २०२१ पासून समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील पालिका प्रशासनाकडे तसेच वाहतुक पोलिसांकडे सातत्याने लेखी पाठपुरावा करत आहेत, पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या सतत भेटी घेत निवेदन सादर करून समस्येचे गांभीर्य व रहीवाशांना होत असलेला त्रासही त्यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला आहे. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची सुनिता देविदास हांडेपाटील यांनी भेट घेवून ही समस्या मांडली असता त्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन देत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशही दिले.

Previous Post

महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकण्याचा रहीवाशांचा इशारा

Next Post

नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या प्रारुप प्रभाग रचनेच्या हरकती,सूचनांवर १७ फेब्रुवारीला सुनावणी

Next Post
प्रभाग ८७ मधील कंडोनिअम अंर्तगत कामे करा : सौ. सुनिता रतन मांडवे

नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या प्रारुप प्रभाग रचनेच्या हरकती,सूचनांवर १७ फेब्रुवारीला सुनावणी

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती व तपासणी विषयक विविध उपक्रम संपन्न

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती व तपासणी विषयक विविध उपक्रम संपन्न

नवी मुंबई शहरातील भिक्षेकऱ्यांनाही कोव्हिड १९ ची लस द्या : संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहा परिसरातील पथदिव्यातील अंधुक प्रकाशाची समस्या दूर करा : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com