• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 30, 2021

महिला आशियाई करंडक फु़टबॉल स्पर्धेच्या तयारीचा आयुक्त अभिजित बांगरांनी घेतला आढावा

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
महिला आशियाई करंडक फु़टबॉल स्पर्धेच्या तयारीचा आयुक्त अभिजित बांगरांनी घेतला आढावा

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

 

नवी मुंबई : १७ वर्षाखालील महिला अशियाई फुटबॉल करंडक स्पर्धा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत संपन्न होत असून या स्पर्धेच्या शुभारंभाचा सामना तसेच अंतिम सामना नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉ. डि.वाय.पाटील स्टेडियममध्ये कोव्हीडविषयक सर्व नियमांचे कोटेकोर पालन करून खेळविला जाणार आहे. या जागतिक स्तरावरील स्पर्धेचे यजमानपद नवी मुंबई शहराला लाभलेले असून या स्पर्धेचे सराव सामने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर १९ नेरुळ येथील डॉ. यशवंतराव चव्हाण फुटबॉल मैदानामध्ये होणार आहेत. यापूर्वीही सन २०१७ मध्ये फिफा – १७ वर्षाखालील पुरुष विश्वचषक स्पर्धेचे काही सामने नवी मुंबईत खेळविण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकवार या आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबई यजमानपद भूषवित आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे सेक्टर १९ नेरुळ येथे सन २०१७ मधील फिफा स्पर्धेकरिता विकसित करण्यात आलेले यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगण आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून त्यावेळी त्याठिकाणी सराव केलेल्या न्यूझिलंड, इंग्लड, स्पेन, ब्राझिल, बाली, टर्की अशा नामांकीत संघातील खेळाडूंनी केली होती. पुढील महिन्यात होणाऱ्या १७ वर्षाखालील महिला आशियाई फुटबॉल करंडक स्पर्धेच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणाची व तेथील सुविधांची महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह बारकाईने पाहणी केली व जगभरातून येणाऱ्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये यादृष्टीने सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या मौल्यवान सूचना केल्या.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, क्रीडा विभागाचे उप आयुक्त मनोजकुमार महाले, घनकचरा व्यवस्तापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, विभाग अधिकारी श्रीम. मिताली संचेती, कार्यकारी अभियंता अजय संख्ये व सुभाष सोनावणे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने फिफा आयोजकांच्या तांत्रिक समितीने महानगरपालिकेच्या क्रीडा व अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणाची व तेथील सुविधांची दोनदा पाहणी केली असून त्या अनुषंगाने शॉवर सुविधेसह ड्रेसींग रूम, रेस्ट रुम, वेटींग लाँज, स्टोअर रुम अशा आवश्यक सुविधांची तसेच पुरेशा प्रमाणात फ्लड लाईट्सची सर्व अनुषांगिक सुविधांसह व्यवस्था करण्यात आलेली आहे. या प्रत्येक सुविधा कक्षाला आयुक्तांनी भेट देऊन त्याची बारकाईने पाहणी केली व यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

जगभरातून येणाऱ्या या महिला खेळाडूंची निवास व्यवस्था ज्या भागामध्ये कऱण्यात आलेली आहे त्याठिकाणच्या सुविधांवरही आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन यांच्याशी संपर्कात राहून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही यावरही काटेकोर लक्ष ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या

नवी मुंबई महानगरपालिकेने फिफा आणि आशियाई करंडक स्पर्धेच्या निमित्ताने विकसित केलेले हे फुटबॉल क्रीडांगण या स्पर्धा झाल्यानंतर शहरातील फुटबॉल खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात यावे व त्यांच्यामधून दर्जेदार व्यावसायिक संघ निर्माण करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे असे आयुक्तांनी क्रीडा विभागास निर्देशित केले. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असून महानगरपालिका शाळांमधूनही फुटबॉलचे प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन खेळाडू घडवावेत असे निर्देशित करतानाच आयुक्तांनी सांघिंक खेळांमधून व्यक्तीचा विकास होतो हे स्पष्ट करीत फुटबॉल, हॉकी प्रमाणेच खो-खो, कबड्डी अशा देशी खेळांनाही प्रोत्साहित करण्याची भूमिका मांडली. यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिका यादृष्टीने नियोजनबध्द काम करेल असा विश्वास आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous Post

प्रभाग ९६-९७ मध्ये दिनदर्शिका वितरणास प्रारंभ

Next Post

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

Next Post
नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

लोकोपयोगी उपक्रमांच्या सप्तहांनी होणार महादेव पवारांचा वाढदिवस साजरा

राष्ट्रवादी कॉंग्रेस रविवारी राबविणार नेरूळमध्ये स्वच्छता अभियान

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये विना मास्क आढळून येणाऱ्या रहीवाशांवर व व्यावसायिकांवर कारवाई अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com