• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 27, 2021

मुले, आरोग्यकर्मी, कोरोना योध्दे, ज्येष्ठ नागरिकांच्यालसीकरणाच्या नियोजनासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतली विशेष बैठक

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
मुले, आरोग्यकर्मी, कोरोना योध्दे, ज्येष्ठ नागरिकांच्यालसीकरणाच्या नियोजनासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतली विशेष बैठक

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोव्हीड रुग्णांची मागील काही दिवसांपासून वाढती संख्या तसेच ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन दररोज १० हजार टेस्ट्सपर्यंत केले जाणारे कोव्हीड टेस्टींग कमी होऊ न देता त्यामध्ये वाढ करण्याचे निर्देश देण्याप्रमाणेच दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांच्या ८५ टक्केपर्यंत झालेल्या लसीकरण प्रमाणातही वाढ करुन कोव्हीड लसीकरणाला वेग देण्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत आरोग्य विभागास सूचित करण्यात आले आहे.

कोव्हीड व्हेरियंटचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोव्हीड लसीकरणाद्वारे जास्तीत जास्त नागरिक संरक्षित व्हावेत यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून १० जानेवारीपासून आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे ६० वर्षावरील नागरिक यांनाही ‘प्रतिबंधात्मक डोस’ दिला जाणार आहे.

या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत लसीकरणाचे नियोजन करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने बैठक घेत या लसीकरणासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कटके उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेने जलद गतीने लसीकरण पूर्ण करण्याकडे कोव्हीड सेंटर्स संख्येत १०१पर्यंत वाढ करून सुरुवातीपासूनच काटेकोरपणे लक्ष दिल्याने १८ वर्षावरील १०० टक्के नागरिकांना कोव्हीड लसीचा पहिला डोस पूर्ण करणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिली महानगरपालिका होती. त्यानंतर दुसऱ्या डोसच्या पूर्णत्वाकडेही विशेष लक्ष देत लसीकरणाला वेग देण्यात आला असून ८५ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत.

लसीकरणाचा आढावा घेताना उर्वरित नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यावर भर देण्याप्रमाणेच नव्याने समाविष्ट होणाऱ्या १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी पहिला डोस त्याचप्रमाणे दोन्ही डोस पूर्ण झालेले आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे आणि सहव्याधी असणारे ६० वर्षावरील नागरिक यांना ‘प्रतिबंधात्मक डोस’ देण्याबाबत नवीन सेंटर्स सुरु करण्याचे नियोजन करण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले.

त्यासोबतच सोसायट्यांमध्ये जाऊनही लसीकरण करण्याचा आराखडा तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सध्या कार्यान्वित नसलेल्या कोव्हीड केअर सेंटर्सचाही उपयोग लसीकरणासाठी करण्याबाबत विचार करण्याचे आयुक्तांनी यावेळी सूचित केले. १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी शाळांमध्ये लसीकरणाची पथके पाठवून लसीकरण करण्याबाबत सांगोपांग विचार करावा व नियोजन करावे असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तत्परतेने केली जात असून पंतप्रधान महोदयांनी जाहीर केल्याप्रमाणे १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हीड लसीचा पहिला डोस तसेच दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे ६० वर्षावरील नागरिक यांना ‘प्रतिबंधात्मक डोस’ देण्याबाबतचे नियोजन करण्यास त्वरित सुरुवात करण्यात आलेली आहे. सर्व महापालिका रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रे यांच्या वेबसंवादाव्दारे घेतल्या जाणाऱ्या नियमित बैठकीमध्ये आयुक्त या नवीन लसीकरणाविषयी सविस्तर चर्चा करणार असून तत्परतेने लसीकरण करून घेण्याकरिता वैद्यकीय अधिकारी यांना सूचना दिल्या जाणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जात असून नागरिकांनीही विहित वेळेत लसीकरण करून घ्यावे तसेच लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा नियमित वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

०००००००००००००००००० ००००००००००००००००

नवी मुंबई लाईव्हचे संपर्कासाठी कार्यालय :

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील

कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट क्रं ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (प.), नवी मुंबई

Previous Post

कोव्हीड प्रतिबंधात्मक उल्लंघनापोटी दोन दिवसात २ लक्ष ८० हजाराहून अधिक दंडत्मक वसूली

Next Post

निरगुडसरच्या पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयातील दहावीच्या १९८३च्या बॅचचा गेटटुगेदर उत्साहात

Next Post
निरगुडसरच्या पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयातील दहावीच्या १९८३च्या बॅचचा गेटटुगेदर उत्साहात

निरगुडसरच्या पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयातील दहावीच्या १९८३च्या बॅचचा गेटटुगेदर उत्साहात

नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

मुख्यमंत्रीसाहेब, नवी मुंबईतील मच्छिमारांना विशेष पॅकेज जाहीर करा : संदीप खांडगेपाटील

प्रभाग ९६-९७ मध्ये दिनदर्शिका वितरणास प्रारंभ

प्रभाग ९६-९७ मध्ये दिनदर्शिका वितरणास प्रारंभ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com