• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 31, 2021

आर्थिक अडचणीमुळे नवी मुंबईत एकाच कुटूंबातील तिघांची आत्महत्या

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
आर्थिक अडचणीमुळे नवी मुंबईत एकाच कुटूंबातील तिघांची आत्महत्या

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

 नवी मुंबई : दिवाळी आता अवघ्या काही तासावर आलेली असतानाच सर्वांच्या घरात दिवे, पणती, कंदिलाच्या माध्यमातून रोषणाईची जय्यत तयारी सुरू असतानाच वाशीतील कामवणी परिवारावर मात्र सामूहिक आत्महत्या कऱण्याची दुर्देवी वेळ आली आहे. विशेष म्हणजे एकाच घरातील आत्महत्या केलेले तिघेही ज्येष्ठ नागरिक असल्याने नवी मुंबईतील वाशी परिसरात खळबळ उडाली आहे. घरात आर्थिक उत्पन्नाचा  मार्ग बंद झाल्यामुळे एकाच घरातील तीन जणांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना वाशी सेक्टर ४ येथे घडली आहे.

दरम्यान, कामवानी कुटुंबाचा त्यांच्या काही नातेवाईकांशी दीर्घकाळ आर्थिक वाद होता आणि त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये काही तक्रारी देखील नोंदवल्या होत्या. ‘आमच्या मुद्द्यांवर न्याय न मिळाल्यास आत्महत्या करु ,’ असे पत्र त्यांनी २०१२ मध्ये भारताचे राष्ट्रपती आणि इतर राज्य आणि केंद्रीय कार्यालयांना लिहिले होते. मोहिनी कमवानी आणि त्यांचा मुलगा दिलीप यांनी यापूर्वी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर त्यांच्या न्याय मागण्यांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांशी आर्थिक वाद सोडवण्यासाठी उपोषण केले होते.

आई मोहिनी नारायनदास कामवणी (वय ८७ वर्ष), मुलगा दिलीप नारायनदास कामवाणी वय ६७ वर्ष व मुलगी कांता नारायनदास कामवाणी वय ६३ वर्ष हे तिघेही वाशी सेक्टर ४ मधील माऊली सोसायटीमध्ये राहायला होते. घरगुती आर्थिक नैराश्यातुन ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या व्यतिरिक्त यामागे आणखी काही कारण आहे का याचा तपास वाशी पोलीस करत आहे.

मागील अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणीमुळे कामवानी कुटुंबीय नैराश्येत होते आणि या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पैशांचा काही स्रोत नसल्याने आर्थिक विवंचना होती. आर्थिक मार्ग सर्वच बंद झाल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे दिलीप कामवाणी यांनी ज्यावेळी तिघांना रुग्णालयात दाखल केले त्यादरम्यान पोलीसांना दिलेल्या जबाबात सांगितल्याची माहिती वाशी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी दिली. दिवाळी आता अवघ्या काही तासावर आलेली असतानाच कामवानी परिवाराचा दिवा पैशाच्या चणचणीमुळे कायमचाच विझल्याची हळहळ स्थानिक भागातील रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शनिवारी सकाळी ७.३०च्या सुमारास दिलीप कमवानी यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यांनी त्यांच्या आई आणि बहिणीसह आर्थिक समस्यांमुळे विष प्राशन केले असल्याची माहिती पोलिसांना फोनवरून दिली. नियंत्रण कक्षाने वाशी पोलिस स्टेशनला कळवताच पोलिस त्यांच्या घरी पोहोचले आणि तातडीने तिघांना उपचारासाठी महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी दिली.  दिलीप कामवानी शुद्धीवर असताना आम्ही त्यांचे स्टेटमेंट नोंदवले. या तिघांनी उंदीर मारण्याचे विष, बेगॉन रसायन आणि काही गोळ्यांचे सेवन केले होते. आर्थिक संकटामुळे नैराश्यात असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. याप्रकरणी आम्ही तीन वेगवेगळ्या अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, असे पोलीसांनी सांगितले. वाशी पोलिसांनी शनिवारी सकाळी तिन्ही रुग्णांना आपत्कालीन कक्षात आणले होते. त्यांनी विषारी रसायनाचे मिश्रण प्राशन केल्याचे दिसते, ज्याचे रासायनिक विश्लेषणाने अद्याप निश्चित झालेले नाही असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे म्हणाले.

Previous Post

शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या भाजपाला शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा अधिकार नाही : अतुल लोंढे

Next Post

सर्वसामान्य नागरिकांसह लहान व मध्यम विकासक आणि व्यावसायिकांकरिता आणली भूखंड आणि वाणिज्यिक गाळे विक्रीची सिडकोची भव्य योजना

Next Post
सर्वसामान्य नागरिकांसह लहान व मध्यम विकासक आणि व्यावसायिकांकरिता आणली  भूखंड आणि वाणिज्यिक गाळे विक्रीची सिडकोची भव्य योजना

सर्वसामान्य नागरिकांसह लहान व मध्यम विकासक आणि व्यावसायिकांकरिता आणली भूखंड आणि वाणिज्यिक गाळे विक्रीची सिडकोची भव्य योजना

मास्टरदीप शैक्षणिक संस्थेकडून हवालदार इकबाल शेख यांचा सन्मान

मास्टरदीप शैक्षणिक संस्थेकडून हवालदार इकबाल शेख यांचा सन्मान

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नमुंमपाच्या आरटी-पीसीआर लॅब विस्तारीकरणाचे लोकार्पण

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नमुंमपाच्या आरटी-पीसीआर लॅब विस्तारीकरणाचे लोकार्पण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com