• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 22, 2021

वाशी सार्वजनिक रुग्णालयाला अचानक भेट देत आयुक्तांनी केली वैद्यकीय सेवांची पाहणी

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
वाशी सार्वजनिक रुग्णालयाला अचानक भेट देत आयुक्तांनी केली वैद्यकीय सेवांची पाहणी

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९९६७७७१७८०

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाला पूर्वसूचना न देता अचानक भेट देत विविध बाबींची पाहणी केली.

सद्यस्थितीत डेंग्यू आजाराचा वाढता प्रसार काहीसा आटोक्यात येताना दिसत असून सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे उपचार घेत असलेल्या संशयीत डेंग्यू रुग्णांच्या वॉर्डला भेट देत आयुक्तांनी आरोग्य स्थितीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतला. तेथील काही रुग्णांशी संवाद साधून त्यांनी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांविषयी थेट माहिती घेतली. अनेकदा रुग्णांना प्लेटलेट्सची गरज भासते. त्याची पूर्तता नवी मुंबई महानगरपालिकेनेमार्फतच करण्याचे आदेश यापूर्वीच आयुक्तांनी निर्गमित केलेले असून त्यानुसार कार्यवाही होत असल्याबाबत त्यांनी तपासणी केली.

वाशी रुग्णालयातील रक्तपेढीची पाहणी करीत तेथील रक्तसाठ्याची उपलब्धतता व प्लेटलेट्सची आवश्यकता भागविण्याची विद्यमान पध्दत याविषयीची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. रक्तपेढीला भासणारी रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी सद्यस्थितीत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे अशी सूचना आयुक्तांनी केली.

वाशी रुग्णालयामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रुबी एलकेअर सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या सिटी स्कॅन सेंटरमधील चाचण्यांच्या पध्दतीची आयुक्तांनी बारकाईने माहिती घेतली तसेच मागील तीन महिन्यात तपासणी करण्यात आलेल्या सिटी स्कॅनच्या विविध प्रकाराचे संगणकीय अहवाल तपासले. यामध्ये सद्य:स्थितीत एचआरसीटी तपासणी संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे नमूद करत आयुक्तांनी कोव्हीड तपासणीसाठी सरसकट एचआरसीटी तपासणी न करता त्यापूर्वी ॲन्टिजन, आरटी-पीसीआर टेस्ट कराव्यात व त्यानंतरच वैद्यकीय गरज लक्षात घेऊन एचआरसीटी सूचवावी अशा सूचना दिल्या.

महापालिका रुग्णालयातून हिरानंदानी फोर्टीज रुग्णालयात संदर्भित केल्या जाणाऱ्या रुग्णांची कागदपत्राविना आडवणूक होऊ नये याकडे बारकाईने लक्ष देत याबाबतची प्रणाली अद्ययावत करून घ्यावी व तेथील संदर्भित रुग्णांच्या दाखल होण्याच्या व बरे होऊन घरी परतण्याच्या नोंदी नियमित ठेवाव्यात असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. नवी मुंबई महानगरपालिकेची रुग्णालयांमधील स्वच्छता चांगल्या प्रकारे राखली जात असून त्याची दखल विविध पातळीवर घेतली जाते असे सांगत हाच लौकीक कायम राहील यासाठी दक्ष राहण्याचे निर्देशही आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले.

Previous Post

‘मिशन युवा स्वास्थ्य’ मोहिमेसाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज

Next Post

नवी मुंबई महापालिकेकडून पहिल्याच दिवशी १० महाविद्यालयात ४०७ विद्यार्थ्यांचे लसीकरण

Next Post
नवी मुंबई महापालिकेकडून पहिल्याच दिवशी १० महाविद्यालयात ४०७ विद्यार्थ्यांचे लसीकरण

नवी मुंबई महापालिकेकडून पहिल्याच दिवशी १० महाविद्यालयात ४०७ विद्यार्थ्यांचे लसीकरण

सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ करीता आरडीएसओकडून वेगाचे अंतरिम प्रमाणपत्र प्रदान

सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ करीता आरडीएसओकडून वेगाचे अंतरिम प्रमाणपत्र प्रदान

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून उभारलेल्या सानपाडा येथील सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याचा शुभारंभ उत्साहात

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून उभारलेल्या सानपाडा येथील सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याचा शुभारंभ उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com