• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 16, 2021

नेरूळ सेक्टर ६ आणि सारसोळे गावात घरटी आरोग्य अभियान राबवा : मनोज मेहेर

adminbyadmin
in Uncategorized
0
सायन्स पार्क व म्युझियमचे काम महत्वाचे नाही, लसीकरण महत्वाचे : मनोज मेहेर

संपादक : सौ. सुवर्णा पिंगळे – खांडगेपाटील : ९८२००९६५७३ ( केवळ व्हॉटसअप)

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : आरोग्य विभागाच्या माध्यमातून नेरूळ सेक्टर ६ आणि सारसोळे गावात घरटी आरोग्य अभियान राबविण्याची लेखी मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य व सारसोळे गावचे ग्रामस्थ मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

कोरोना महामारीमुळे गेली पावणे दोन वर्षे नवी मुंबईतील रहीवाशी आणि प्रकल्पपग्रस्त, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यातच डेल्टा, म्युकरकोसिसचे सावट आहे. तिसरी लाट येणार म्हणून भय  कायम आहे. त्यातच आता गेल्या काही दिवसापासून नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी आणि सारसोळे गावचे ग्रामस्थ सांधेदुखी, पायाला सुज येणे, अंग दुखणे, कणकण जाणवणे अशा व्याधींचा सामना करत आहे. ही व्याधी अचानक शंभराच्या आसपास रहीवाशी व ग्रामस्थांना सहन करावी लागत आहे. अचानक हे आजार बळावल्याने नेरूळ सेक्टर ६ मधील रहीवाशी आणि सारसोळे गावचे ग्रामस्थ चिंतातूर आहेत. हे साथीचे आजार आहेत अथवा कोरोनामुळे निर्माण झालेले आजार  आहेत, याबाबत संभम्रावस्था कायम आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून नेरूळ सेक्टर ६ परिसरात तसेच सारसोळे गावात घरोघरी जावून रहीवाशांची व ग्रामस्थांची आरोग्य विषयक चाचपणी अभियानाच्या माध्यमातून करावी. उद्या या आजाराचा उद्रेक झाल्यास जिवितहानी होण्याची भीती आहे. अचानक निर्माण झालेल्या व्याधीबाबतही पालिका प्रशासनाला अभियानामुळे माहिती होईल व उपचार करणे सोयिस्कर होईल. त्यामुळे आपण संबंधितांना नेरूळ सेक्टर ६ व सारसोळे  गावात घरटी आरोग्य अभियान राबविण्याचे निर्देश देण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना ३० ऑगस्ट २०२१ रोजी लेखी निवेदन सादर करताना समस्येचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. आयुक्त कार्यालयातून संबंधित निवेदन समस्या निवारणासाठी Additional Commissioner Services Commissioner Services,  <amcservices@nmmconline.com>, Medical Officer Health <moh@nmmconline.com>

या सर्वाना फॉरवर्डही करण्यात आले. तथापि यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. आजही सारसोळे गावात ग्रामस्थ व नेरूळ सेक्टर ६ परिसरात रहीवाशी आजारी आहेत. डेंग्यूचेही रूग्ण वाढीस लागले आहे. लोक खासगी दवाखाने व रूग्णालयात उपचार करत असल्याने आणि खासगी दवाखाने व रूग्णालयाकडून पालिका प्रशासनाला याबाबत काहीही कळविले जात नसल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाला याबाबत माहिती होत नाही. आजाराचा उद्रेक होवून सारसोळे गावात तसेच नेरूळ सेक्टर ६ परिसरात आजाराने जिवितहानीचा उद्रेक होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने आरोग्य तपासणीसाठी घरटी अभियान राबविण्याची मागणी सारसोळेचे ग्रामस्थ मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

दापोली, मंडणगड, खेड या तालुक्यामधील वीजेचा खेळखंडोबा थांबवा : हाजी शाहनवाझ खान

Next Post

प्रतिक्षा महापालिकेच्या निवडणूकांची!

Next Post
प्रतिक्षा महापालिकेच्या निवडणूकांची!

प्रतिक्षा महापालिकेच्या निवडणूकांची!

विकासकामे कोणासाठी? जनतेच्या फायद्यासाठी का ठेकेदाराच्या नफ्यासाठी!

विकासकामे कोणासाठी? जनतेच्या फायद्यासाठी का ठेकेदाराच्या नफ्यासाठी!

कोपरखैराणे सेक्टर २३ मधील पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : सुनिता हांडेपाटील

कोपरखैराणे सेक्टर २३ मधील पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सुनिता हांडेपाटील यांचा पाठपुरावा कायम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com