• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 24, 2021

थकबाकीदार ११९ जप्त मालमत्तांवरील भूखंड / मिळकती विक्रीच्या कार्यवाहीचा हुकुमनामा प्रसिध्द

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रभाग ८७ मधील कंडोनिअम अंर्तगत कामे करा : सौ. सुनिता रतन मांडवे

संपादक : संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : ९८२००९६५७३

Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :थकबाकीसह मालमत्ताकर भरण्याची नोटीस बजावूनही नोटीशीच्या विहीत कालावधीत थकबाकी न भरणाऱ्या ११९ मालमत्ताधारकांवर कायदेशीर कारवाई करीत थकबाकी वसूल करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ताधारक यांच्या नावावर असलेले मोकळे भूखंड / मिळकती जप्त करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण ८ मधील नियम ४५ अन्वये सदर जप्तीची कार्यवाही करण्यात आली असून मालमत्ताकर थकबाकीदार कसूरदाराने त्यांच्या मिळकतीवरील कराची रक्कम वसूलीच्या खर्चासह २१ दिवसाच्या आत महानगरपालिकेकडे जमा केली नाही तर मिळकतीची विक्री करण्यात येईल असा हुकुमनामा मालमत्ताकर विभागामार्फत जारी करण्यात आलेला आहे.

सदर मिळकतधारक / मालक यांनी सदर मिळकत विक्री / गहाण, दान या व अन्य प्रकारे मालकी हक्कामध्ये बदल करण्यास प्रतिबंधीत करण्यात येत असल्याचे हुकुमनाम्यात स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे.

मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असल्याने मालमत्ताकर विषयक बाबींचा नियमित आढावा महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांच्या वतीने घेतला जात असून थकबाकीदारांना अभय योजनेची सवलत देऊनही त्याचा लाभ न घेणाऱ्या व त्यानंतरही नोटीशीस प्रतिसाद न देणाऱ्या मोठ्या मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई केली जात आहे.

मालमत्ताकर थकबाकीदारांना थकबाकीच्या रक्कमेमध्ये ७५ टक्के इतकी सवलत देण्याची अभय योजना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली होती. या दोन महिन्यांच्या कालावधीतही अभय योजनेला प्रतिसाद न देणाऱ्या मोठ्या रक्कमेच्या मालमत्ताकर थकबाकीदारांना नोटीस बजावून संधी देण्यात आली होती. तथापि या नोटीशीचा कालावधी संपूनही नोटीशीला प्रतिसाद न देणाऱ्या ११९ मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये बेलापूर विभागातील १९, नेरुळ विभागातील २०, वाशी विभागातील ३४, तुर्भे विभागातील १०, कोपरखैरणे विभागातील १७, घणसोली विभागातील १२ व ऐरोली विभागातील ७ अशा एकूण ११९9 मालमत्तांचा समावेश आहे.

या ११९ मालमत्ताधारकांना रक्कम भरणा करण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आलेली असून या कालावधीतही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची विक्री केली जाणार आहे याची स्पष्ट सूचना हुकुमनाम्याव्दारे जाहीर करण्यात आलेली आहे. सदर हुकुमनामा नागरिकांच्या माहितीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www. Nmmc . gov . in यावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

   तरी सदर ११९ मालमत्ताकर थकबाकीदार कसुरदारांनी त्यांच्या मिळकतीवरील कराची रक्कम वसूलीच्या खर्चासह २१ दिवसांच्या आत महानगरपालिकेकडे जमा करावी अन्यथा मिळकतीची विक्री केली जाईल हे लक्षात घ्यावे तसेच नागरिकांना या मिळकतीसंबंधी खरेदी / गहाण, दान व अन्य तऱ्हेने मालकी हक्कात बदल करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने थकबाकीदारांविरोधातील कारवाई अशीच सुरु राहणार असून थकबाकीदारांनी आपल्या मालमत्तांची जप्ती / विक्री याची वाट न बघता मालमत्ताकर थकबाकीचा भरणा करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान मोठे : एच. के. पाटील.

Next Post

आज कोरोनाचे नवे ३८ रूग्ण, २ मृत्यू

Next Post
कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

आज कोरोनाचे नवे ३८ रूग्ण, २ मृत्यू

पनवेल-उरण भागातील सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये स्थानिक रहीवाशांसाठी ठराविक कोटा आरक्षित ठेवा : हाजी शाहनवाझ खान

पनवेल-उरण भागातील सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये स्थानिक रहीवाशांसाठी ठराविक कोटा आरक्षित ठेवा : हाजी शाहनवाझ खान

फेस्टीव्हल अॅडव्हान्ससह विशेष भत्यासाठी इंटक आग्रही

फेस्टीव्हल अॅडव्हान्ससह विशेष भत्यासाठी इंटक आग्रही

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com