
काँग्रेस शहराध्यक्षा नाझीमा मुकादम कडाडल्या – म्हसळा
नगरपंचायत बरखास्त होणार का ?
म्हसळा / जितेंद्र नटे
म्हसळा तालुक्यात जबरदस्त जनता जागृत झालेली आहे. आता
कुठे जनतेला कळू लागले आहे. विकास कामे करायची सोडून प्रशासकीय सरकारी बाबू करतात काय?
पाणी, रस्ते, वीज, आरोग्य अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यांचा खर्च नगरपंचायत ने करून आपल्या
नागरिकांना सेवा पुरवायच्या असतात. कारण त्या साठीच आपण टॅक्स – घरपट्टी भरत असतो. मात्र एवढे
भरून सुद्धा साधे प्यायचे पाणी मिळणार नसेल, रस्ते सुरक्षित व चांगले मिळणार नसतील
तर काय फायदा? यासाठीच जनतेला जागृत करण्यासाठी काँग्रेसच्या म्हसळा शहर अध्यक्षा
मुकादम यांनी जोरदार धडक मोर्चा काढला होता.
म्हसळा शहरात काही ठिकाणी वार्ड क्रमांक ९ व १४ मध्ये दूषित पाणी, कमी पाणी आणि असुरक्षित टाकी या संधर्भात काही दिवसापूर्वी नाजिमा मुकादम आणि काँग्रेस पार्टी हे उपोषणास बसले होते. त्यांना म्हसळा नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज उकिरडे यांनी सात दिवासात कामे करू असे आश्वासन पर पत्र दिले होते. मात्र कामे काहीच झाली नाहीत. उलट नगराध्यक्षा यांनी आपले म्हणणे चुकीच्या पद्धतीने मांडत दिशाभूल करत होत्या. शेवटी यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी म्हसळा तालुक्यात काल काँग्रेस च्या वतीने “”धडक हंडा मोर्चा” काढण्यात आला. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून म्हसळ्याची जनता आता या नगरसेवकांना पुन्हा निवडून देतील का? याची शंका येऊ लागली आहे. अनेक लोकांनी मोठ्या विश्वासाने म्हसळा नागरपंच्यात मध्ये नगरसेवक निवडून दिले होते. मात्र सध्याच्या नगरसेवकांनी नगराचा विकास कमी आणि स्वतःचा विकास जास्त अशीच पद्धत अवलंबली आहे. त्याचाच परिणाम सध्या दिसून येत असून आगामी निवडणुकीत १८ च्या १८ नगरसेवक घरी बसतील अशी चर्चा रंगू लागली आहे आणि नवीन, होतकरू तरुण पुढे येऊन बाजी मारतील असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. म्हसळा शहरातील जनता सध्याच्या नगरसेवकांवर नाराज असून भविष्यात चांगले उमेद्वार, तरुण उमेदवार आणि म्हसळ्यातील स्थानिक उमेदवार आसवावेत असा सूर आळवताना दिसत आहेत.