
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात प्रवेश करणाऱ्या अंर्तगत रस्त्याच्या सुरुवातीलाच एलईीडी फ्लर्ड अथवा मिनी हायमस्ट बसविण्याची मागणी सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
प्रभाग ८५ व ८६ मध्ये सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसराचा समावेश होत आहे. सारसोळे गाव तसेच नेरूळ सेक्टर सहा परिसऱात मुख्य रस्त्यावरून अंर्तगत रस्त्यात प्रवेश करताना सगळ्याच ठिकाणी अंधुक प्रकाश अथवा काळोखच पहावयास मिळतो. मुख्य रस्त्यावरून अंर्तगत रस्त्यात प्रवेश करताना त्या ठिकाणी असलेले पथदिवे एकतर बंद आहेत अथवा अंधुक प्रकाश देत असल्याने रहीवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. कोरोनामुळे सर्वत्र सामसुम लवकर होते. कमी वर्दळ तसेच अंधुक प्रकाश यामुळे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनातून कारटेप चोरीला जाणे, वाहनाचे लोगो चोरीला जाणे, वाहनाचे टायरही चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यातून सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये अंर्तगत रस्त्यावर प्रवेश करण्याच्या ठिकाणी एलईडी प्लर्ड अथवा मिनि हायमस्ट बसविल्यास उजेड निर्माण होईल व चोरीच्या घटनानाही आळा बसेल. समस्येचे गांभीर्य पाहता सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर ६ परिसरात मुख्य रस्त्यावरून अंर्तगत रस्त्यात प्रवेश करण्याच्या ठिकाणी एलईीडी फ्लर्ड अथवा मिनी हायमस्ट बसविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.