• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 23, 2020

आ.मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांना यश! एकविरा मंदिर सुशोभिकरण, सोयी- सुविधांसाठी ना. आदित्य ठाकरेंचा ग्रीन सिग्नल

adminbyadmin
in Uncategorized
0
भाजप उमेदवार मंदाताई म्हात्रेंच्या प्रचारासाठी शुक्रवारी सारसोळे, कुकशेतला प्रचार रॅली

नवी मुंबई : महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांवर देवीदेवतांची मंदिरे आहेत. आई एकविरा माता आगरी-कोळी समाजाची कुलदैवत आहे. आगरी-कोळी समाजाबरोबरच महाराष्ट्रातील असंख्य भाविक आई एकविरा मातेच्या दर्शनासाठी कार्ला गडावर येत असतात. त्यातील अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी पायर्‍या चढून मंदिराकडे जातात, तर काही ज्येष्ठ भाविकांना वयोमानानुसार पायर्‍या चढून जाणे जमत नसल्याने ते पायथ्याजवळ असलेल्या मंदिरातील आई एकविरा मातेचे दर्शन घेऊन माघारी फिरतात.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे सहकुटुंब आई एकविरा मातेच्या दर्शनासाठी गेले होते. आई एकविरा माता ठाकरे कुटुंबाचे देखील कुलदैवत असल्याचे प्रसारमाध्यमांतून समजल्यानंतर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आई एकविरा मंदिर सुशोभिकरण, सोयी- सुविधांसाठी ना. आदित्य ठाकरेंचा ग्रीन सिग्नल एकविरा माता मंदिर सुशोभिकरणाचा आणि तेथील सोयी-सुविधांचा विषय नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात 19 डिसेंबर 2019 रोजी पुरवणी मागणीद्वारे मांडला होता. एकविरा देवीच्या मंदिरात जाण्याकरिता रोप-वे बरोबरच जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी यासाठी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आग्रही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर मंदिराच्या सुशोभिकरणासाठी आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी प्रमुख मागणी देखील आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पुरवणी मागणीतून केली होती. सदरहू व्यवस्था केल्यानंतर आई एकविरा माता आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल, असेही त्या पुढे म्हणाल्या.
दरम्यान, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आई एकविरा माता मंदिराचे सुशोभिकरण आणि इतर महत्वाच्या पायाभूत सोयी-सुविधा करण्याबाबतचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे आपण केलेल्या प्रयत्नांना ना. आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आ. सौ.मंदाताई म्हात्रे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Previous Post

नेरुळमध्ये महाशिवरात्री निम्मित शिवभक्तांना अल्पोपहार,फळे व पाणी वाटप

Next Post

ज्येष्ठ नागरिकांना नेरूळमध्ये एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्डचे सवलतीच्या दरात वाटप

Next Post
ज्येष्ठ नागरिकांना नेरूळमध्ये एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्डचे सवलतीच्या दरात वाटप

ज्येष्ठ नागरिकांना नेरूळमध्ये एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्डचे सवलतीच्या दरात वाटप

प्रभागह ८५/८६मध्ये मंगळवारी विविध लोकोपयोगी कार्याची मांदियाळी

प्रभागह ८५/८६मध्ये मंगळवारी विविध लोकोपयोगी कार्याची मांदियाळी

नगरसेविका कोमल वास्करांमुळे ज्येष्ठ क्रिकेटपटूंची समस्या निकाली

नगरसेविका कोमल वास्करांमुळे ज्येष्ठ क्रिकेटपटूंची समस्या निकाली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com