• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 11, 2019

स्थानिक भूमीपुत्र मासे विक्रेत्यांसाठी मनसेचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

adminbyadmin
in Uncategorized
0
स्थानिक भूमीपुत्र  मासे विक्रेत्यांसाठी मनसेचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
परप्रातिंय मच्छिमारांविरोधात मनसे आक्रमक. योगेश शेटेंनी दिली महापालिकेला ७ दिवसाची मुदत

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com


अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांवर मनसेची कारवाईची मागणी

नवी मुंबई : अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झालेली सोमवारी बघायला मिळाली. अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्र असलेल्या मासे विक्रेत्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेने सोमवारी महापालिकेला दिला.
गेल्या काही महिन्यांपासून सानपाडा – पामबीच विभागामध्ये रस्त्यासह पदपथावर अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. शिवाजीनगर, मानखुर्द येथून मोठ्या संख्येने अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांचा येथे दिवसेंदिवस वावर वाढतच चालला आहे. हे अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेते निकृष्ट दर्जाची मासळी येथे कमी बाजारभावात विकत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांमुळे सोनसाखळी चोरी, घरफोडी यांसारख्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये देखील वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला आहे. अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांमुळे येथील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या मासेमारांचा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला मासे विक्रीचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांच्या विरोधात मनसेने महापालिका तुर्भे ‘ड’ विभाग कार्यलयाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी समीर जाधव यांना लेखी पत्र देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. महापालिकेने येत्या ७ दिवसांत अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली नाही तर कायदा हातात घेऊन स्थानिक भूमिपुत्र असलेल्या मासे विक्रेत्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी महापालिकेला दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश मढवी, मनसेचे उपविभाग अध्यक्ष देवेंद्र पिल्ले, शाखा अध्यक्ष अमन गोळे, महाराष्ट्र सैनिक सुनंदा दळवी, सायली पवार, श्रीकांत आतकरी, विवेक कदम उपस्थित होते.

Previous Post

माझ्यासोबत आलेल्यांवर मी अन्याय होवू देणार नाही : आ. गणेश नाईक

Next Post

रेल्वे स्टेशन प्रबंधकाच्या कार्यालयातून होणारी पाण्याची चोरी थांबवण्यासाठी मनसे आक्रमक

Next Post
रेल्वे स्टेशन प्रबंधकाच्या कार्यालयातून होणारी पाण्याची चोरी थांबवण्यासाठी मनसे आक्रमक

रेल्वे स्टेशन प्रबंधकाच्या कार्यालयातून होणारी पाण्याची चोरी थांबवण्यासाठी मनसे आक्रमक

राज्यात भाजपविरहीत सत्ता येणार या भितीने राष्ट्रपती राजवटीचा निर्णय: आ. बाळासाहेब थोरात

राज्यात भाजपविरहीत सत्ता येणार या भितीने राष्ट्रपती राजवटीचा निर्णय: आ. बाळासाहेब थोरात

८५ हजार मतांचा जनाधार असणारी राष्ट्रवादी नवी मुंबईत र्निनायकी अवस्थेत

८५ हजार मतांचा जनाधार असणारी राष्ट्रवादी नवी मुंबईत र्निनायकी अवस्थेत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com