• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 18, 2019

काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचे सिध्दीविनायकाला साकडे

adminbyadmin
in मुंबई
0
काॅग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचे सिध्दीविनायकाला साकडे

मुंबई – लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका येत असून या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आमच्यावर तुझी कृपा असू दे! असे साकडे, काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज सिद्धिविनायकाला घातले. त्याचबरोबर त्यांनी महापुरूषांच्या स्मारकांना अभिवादन करित माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची पदाची सूत्रे स्वीकारली.

प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यापूर्वी बाळासाहेब थोरात यांनी आज सकाळी प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यात काँग्रेसला चांगले दिवस येतील अशी तुझी कृपा असू दे, असे गणपती बाप्पांना साकडे घातले. यावेळी त्यांच्यासोबत नवनियुक्त कार्याध्यक्ष बसवराज पाटील, डॉ. विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर थोरात यांनी थेट दादर गाठले. येथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमीला जाऊन अभिवादन केले. यावेळी थोरात यांच्यासह नवनिर्वाचित कार्याध्यक्ष नितीन राऊत होते. येथे काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी त्यांचे जोरदार घोषणा देऊन स्वागत केले. त्यानंतर थोरात यांनी शिवाजी पार्क येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तेथून काँग्रेसचे मुख्य कार्यालय असलेल्या टिळक भवन येथे जाऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले व काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.

यावेळी त्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. थोरात यांनी पदभार स्वीकारताना माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

Previous Post

नगरसेविका सुशीला घरत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

Next Post

राज्यात काँग्रेसचे सरकार येईलः मल्लिकार्जुन खर्गे

Next Post
राज्यात काँग्रेसचे सरकार येईलः मल्लिकार्जुन खर्गे

राज्यात काँग्रेसचे सरकार येईलः मल्लिकार्जुन खर्गे

अण्णासाहेब मिसाळ यांनी स्विकारला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार

अण्णासाहेब मिसाळ यांनी स्विकारला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार

भाजप सरकार प्रियंका गांधी यांना घाबरते: आ. बाळासाहेब थोरात

भाजप सरकार प्रियंका गांधी यांना घाबरते: आ. बाळासाहेब थोरात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com