• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 29, 2019

पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबईकर सुखावले

adminbyadmin
in मुंबई
0
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबईकर सुखावले

मुंबई : पावसाने शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईला झोडपून काढायला सुरुवात केली होती. मात्र आज सकाळी पावसाने ब्रेक घेतला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली होती. मात्र, शनिवारी पावसाने ब्रेक घेतल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईतल्या काही भागात पावसाच्या सरी पडत असल्या तरी मुसळधार पाऊस पडत नसल्याचे समजते.मुंबईत दरवर्षी जूनच्या मध्यात पावसाला सुरुवात होते.

यंदा मात्र जून संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने मुंबईला पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थितीत गुरुवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी पावसाने चांगलाच जोर धरत मुंबईला झोडपून काढले. शुक्रवार सकाळपासून शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरात 127 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 170 तर पूर्व उपनगरात 197 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मुंबईत हिंदमाता, किंग सर्कल, कुर्ला, सायन, अंधेरी, कांजूरमार्ग आदी ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. पाण्यातून मार्ग काढत नागरिकांना आपल्या नियोजित ठिकाण गाठावे लागत होते. कांजूरमार्ग रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले. अंधेरी आणि गोरेगांव येथे विजेच्या धक्क्याने 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. दादर येथेही मीनाताई ठाकरे फुल बाजाराची भिंत कोसळून 3 जण जखमी झाले. मात्र, आज सकाळी पाऊस थांबल्याने शुक्रवारी दिवसभर त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या सरी पडत असल्या तरी मुसळधार पाऊस पडत नसल्याची समजते.

Previous Post

आधी सुविधा मगच पार्किगसाठी दंड आकारा

Next Post

संततधार पावसाने नवी मुंबईला झोडपले

Next Post
पाऊस बरसू लागला, वसुंधरा सुखावली, बळीराजा समाधानी

संततधार पावसाने नवी मुंबईला झोडपले

राज्यात चार ठिकाणी अद्ययावत कर्करोग उपचार सुविधा – गिरीष महाजन

अंमली पदार्थ विकणाऱ्यांना फाशी द्या : अजित पवार

मोनोरेलच्या दादर पूर्व स्टेशनला विठ्ठल मंदिर वडाळा नाव द्या!: डॉ. राजू वाघमारे

मोनोरेलच्या दादर पूर्व स्टेशनला विठ्ठल मंदिर वडाळा नाव द्या!: डॉ. राजू वाघमारे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com