• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 29, 2019

रात्री दीड वाजता मृत्यूची झडप, पुण्यात भिंत कोसळून १७ मजूर ठार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
रात्री दीड वाजता मृत्यूची झडप, पुण्यात भिंत कोसळून १७ मजूर ठार

श्रीकांत पिंगळे

पुणे : वरूण राजाने राज्यात उशिरा हजेरी लावली खरी. परंतु वरूणराजाने संततधार स्वरूपात पुण्यात उपस्थिती दाखविताच रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मृत्यूनेही पुण्यातील कोंढवा परिसरात आपले तांडव दाखविले. इमारतीची भिंत खचून झालेल्या दुर्घटनेत १७ कामगारांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आलं आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे पथक आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून आणखी काही लोकही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. मृतांमध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचा आणि एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

पुण्यातील बडा तालाब मस्जिद भागात आल्कन स्टायलस सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. शुक्रवारी रात्री दिवसभर पाऊस पडत होता. त्यामुळे सोसायटीचं कपाऊंड खचलं आणि मजुरांच्या कच्च्या घरांवर ही भिंत कोसळली आणि त्यामध्ये १७ मजुरांचा मृत्यू झाला. या ठिकाणी मोठ्या बांधकामांसाठी पोकलेन मशीनच्या मदतीने खोदकाम सुरू आहे. त्याला लागून असलेल्या बांधकामावर काम करणाऱ्या झोपड्या होत्या. रात्रभर झालेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरू असलेल्या खोदकामामुळे आल्कन स्यायलस या सोसायटीची भिंत कोसळली. मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या जमीनदोस्त झाल्या.

हे बांधकाम नेमकं कोणत्या बिल्डरकडून करण्यात येत होतं त्याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पावसामुळे ही भिंत खचली आणि ती कोसळून १७ मजुरांचा मृत्यू झाला. हे सगळे मजूर बंगाल आणि बिहार या ठिकाणाहून आले होते अशीही माहिती मिळाली आहे.

या घटनेबाबत बोलताना एनडीआरएफचे सच्चिदानंद गावडे यांनी सांगितले की, कोंढवा परिसरात असणाऱ्या आल्कन स्टायलस इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. या इमारतीच्या बाजूला सुरु असलेल्या निर्माणधीन इमारतीच बांधकाम सुरु होतं त्याठिकाणी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत इमारतीत पार्किंगला असणाऱ्या 4 गाड्याही खाली कोसळल्या. 

घटनास्थळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली असून प्रथमदर्शनी या घटनेत बिल्डर, कंत्राटदारांचा निष्काळजीपणा भोवला असल्याचं दिसतंय मात्र या घटनेची संपूर्ण चौकशी करू असं सांगितले आहे. मृत मजूर हे पश्चिम बंगाल आणि बिहारमधून आल्याचं सांगितलं जातं. पुण्यात सुरु असणाऱ्या पावसाने इमारतीजवळील जमीन भुसभूसीत झाली त्यामुळे संरक्षक भिंत कोसळली.

प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे मात्र कदाचित हा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जाते. कोंढव्यातील ही घटना दुर्दैवी आहे, यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेतील मृत्यूला बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत असा आरोप माजी आमदार महादेव बाबर यांनी केला आहे. 

 

मृतांची नावं

  • आलोक शर्मा (वय-२८), २) मोहन शर्मा (वय-२०), ३) अजय शर्मा (वय-१९), ४) अभंग शर्मा(वय-१९), ५) रवि शर्मा (वय-१९), ६)लक्ष्मीकांत सहानी (वय-३३),७) अवधेत सिंह (वय-२२), ८) सुनील सिंग(वय-३५), ९) सोनाली दास (वय-२), १०)ओवी दास (वय-६), ११)विमा दास (वय-२८) १२) पूजा देवी(वय २८) अशी समोर आलेली नावं आहेत. एकूण सतरा जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

 

Previous Post

आयुक्त रामास्वामींनी केली शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पाहणी

Next Post

रविवारी हार्बर व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

Next Post
रविवारी हार्बर व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

रविवारी हार्बर व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

घाटकोपरमध्येही संरक्षक भिंत कोसळली;६ वाहनांचे नुकसान

घाटकोपरमध्येही संरक्षक भिंत कोसळली;६ वाहनांचे नुकसान

आधी सुविधा मगच पार्किगसाठी दंड आकारा

आधी सुविधा मगच पार्किगसाठी दंड आकारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com