• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 26, 2019

‘डेलॉईट’ कंपनी कोट्यवधी रुपये घेऊन सरकारला कसला सल्ला देते – धनंजय मुंडे

adminbyadmin
in मुंबई
0
राज्यात चार ठिकाणी अद्ययावत कर्करोग उपचार सुविधा – गिरीष महाजन

मुंबई – केंद्र सरकारच्या आयएलएफएस या कंपनीचे ऑडीट करताना ९१ हजार कोटींचा गैरव्यवहार केलेल्या व सेबीने दोषी ठरविलेल्या ‘डेलॉईट’ कंपनीलाच महाराष्ट्र सरकारने १५ कोटींचे सल्ला देण्याचे काम दिले. यात राज्यपाल आणि मुख्य सचिवांपेक्षाही जास्त मानधन घेऊन या कंपनीचे सल्लागार नेमका महाराष्ट्र सरकारला सल्ला तरी काय देतात ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. तसेच ऑनलाईनच्या नावाखाली माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत मोठा गैरव्यवहार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये हा विषय उपस्थित केला. राज्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुका आणि जिल्हास्तरावर इंटरनेटशिवाय वायफायने जोडणारा ‘महानेट’ हा प्रकल्प राज्य सरकारकडून नुकताच सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी पाच सल्लागार समित्या नेमण्यात आल्या आहेत. मात्र यासाठी केंद्र सरकारच्या आयएलएफएस या कंपनीचे ऑडीट करताना ९१ हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सेबीने दोषी ठरवून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु केलेल्या ‘डेलॉईट’ या कंपनीची या प्रकल्पात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप मुंडे यांनी केला. या ‘डेलॉईट’ कंपनीला दरवर्षी सुमारे १५ कोटीचे कंत्राट देण्यात आले आहे. या प्रकल्पात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणाऱ्या सहा कंपन्यापैकी पाच कंपन्या या परदेशी आहेत. या ‘डेलॉईट’ कंपनीच्या प्रमुख सल्लागाराला 3 लाख 56 हजार रुपये तर मुख्य सल्लागाराला 3 लाख 6 हजार रुपये प्रतिमहिना इतके मानधन दिले जात आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना १ लाख ३० हजार तर पालिका आयुक्तांना १ लाख २० हजार प्रतिमहिना इतके वेतन आहे. या कंपनीचे सल्लागार असा कोणता मौलीक सल्ला राज्य सरकारला देत आहेत, की त्यांचे मानधन मुख्य सचिवांपेक्षाही जास्त आहे, असा सवालही मुंडे यांनी केला.

राज्यातील सरकारने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून जेवढ्या कंपन्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्या सर्व कंपन्या अशाच वादग्रस्त आहेत. या कंपन्यांवर शासन विशेषत: माहिती व तंत्रज्ञान विभाग इतका का मेहरबान आहे, याचे गूढ समोर यायला हवे. या सरकारच्या काळात तयार करण्यात आलेली जीएसटी पोर्टल, डीबीटी पोर्टल, पीक विमा, सीईटी परीक्षा, महाकोष, दस्त नोंदणी, ऑनलाईन अॅडमिशन, ऑनलाईन सातबारा अशी ही पोर्टल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने एकतर बंद आहेत, किंवा वादग्रस्त ठरत आहेत. माहिती व तंत्रज्ञान विभागाने नेहमीच प्रतिष्ठीत कंपन्याची निवड करण्याऐवजी सबस्टँडर्ड कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे महानेटच्या या सल्लागार निवडीच्या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणीही मुंडे यांनी केली.

Previous Post

सोशल मीडियावरून धमक्या देणारे भाजप कार्यकर्ते असले तरीही कारवाई होणार!

Next Post

गावाने बहि्ष्कार टाकल्यामुळे महिलेचा गर्भपात

Next Post
गावाने बहि्ष्कार टाकल्यामुळे महिलेचा गर्भपात

गावाने बहि्ष्कार टाकल्यामुळे महिलेचा गर्भपात

‘आधी नवी मुंबईचे मुद्दे अधिवेशनात मांडतो, मगच डॉक्टरकडे जातो’

‘आधी नवी मुंबईचे मुद्दे अधिवेशनात मांडतो, मगच डॉक्टरकडे जातो’

इतकी वर्षे बारगळून ठेवलेला प्रस्ताव निवडणूक येताच सत्ताधाऱ्यांनी तातडीने केला मंजूर

इतकी वर्षे बारगळून ठेवलेला प्रस्ताव निवडणूक येताच सत्ताधाऱ्यांनी तातडीने केला मंजूर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com