• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 21, 2018

मिसेस मुख्यमंत्री, तुम्हालाही जीवघेण्या ‘सेल्फी’चा मोह आवरला नाही

adminbyadmin
in मुंबई
0
मिसेस मुख्यमंत्री, तुम्हालाही जीवघेण्या ‘सेल्फी’चा मोह आवरला नाही

कुठेही गेलं की सेल्फी घ्यायचा हा सध्याचा ट्रेंडच आहे, स्मार्ट फोन ज्यांच्या हातात आहे ते कोणीही याला अपवाद नाहीत. अगदी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीही. होय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई-गोवा क्रुझवर अगदी टोकावर जाऊन सेल्फी घेतला. त्या एकट्याच अगदी टोकावर गेल्या आणि तिथे त्यांनी सेल्फी काढला. त्यांच्या सेल्फी प्रेमाचं कौतुक करायचं की जीव धोक्यात घातला म्हणून डोक्यावर हात मारून घ्यायचा या संभ्रमात पोलीस पडल्याचं दिसून आलं.

शनिवारीपासून मुंबई गोवा क्रुझ पर्यटन सेवा सुरु करण्यात आली. भाऊचा धक्का येथून आंग्रिया ही क्रुझ गोव्याच्या दिशेने रवाना झाली. या क्रुझला केंद्रीय बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवला. या कार्यक्रमाला मिसेस सीएम अर्थात अमृता फडणवीसही हजर होत्या. त्यावेळी त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. आता मिसेस सीएम यांचं सेल्फी प्रेम समजून घेता येऊ शकतं पण क्रुझच्या अगदी टोकाला जाऊन त्यांनी सेल्फी का काढला? याचीच आता चर्चा सुरु झाली आहे.

शनिवारी निघालेली आंग्रिया ही क्रुझ उद्या म्हणजेच रविवारी सकाळी पणजी येथील बंदरावर पोहचणार आहे. या क्रुझवर पर्यटकांसाठी शाही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावावरूनच या क्रुझचं नाव आंग्रिया असं ठेवण्यात आलं आहे. याच क्रुझला झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात मिसेस सीएम अर्थात अमृता फडणवीस यांनी सेल्फी घेतला. तो सेल्फी अशा एका ठिकाणाहून घेतला जे धोकादायक असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

 

 

Previous Post

‘राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे’ मनसेच्या पोस्टरला सेनेचं चोख प्रत्युत्तर

Next Post

नेरूळ सेक्टर दोनमधील पदपथ डागडूजीची विलास चव्हाणांची मागणी

Next Post
नेरूळ सेक्टर दोनमधील पदपथ डागडूजीची विलास चव्हाणांची मागणी

नेरूळ सेक्टर दोनमधील पदपथ डागडूजीची विलास चव्हाणांची मागणी

२५२ तालुक्यांमधील पाणी पातळीची स्थिती चिंताजनक

२५२ तालुक्यांमधील पाणी पातळीची स्थिती चिंताजनक

शिक्षणाधिकार्‍यांनी स्वत: सुरू केली महापालिकेच्या शाळांची काही दिवसांपासून झाडाझडती

शिक्षणाधिकार्‍यांनी स्वत: सुरू केली महापालिकेच्या शाळांची काही दिवसांपासून झाडाझडती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com