• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 1, 2018

म्हाडाकडून अल्प उत्पन्न गटातील रहीवाशांची चेष्टा

adminbyadmin
in मुंबई
0
म्हाडाकडून अल्प उत्पन्न गटातील रहीवाशांची चेष्टा

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची लॉटरी नेमकी कधी फुटणार हा प्रश्न आहेच. पण आता त्याहीपेक्षा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे तो म्हणजे म्हाडा गरीबांची चेष्टा करत आहे का? हा प्रश्न उपस्थित होण्याच कारण म्हणजे मुंबई मंडळाच्या लॉटरीतील अत्यल्प-अल्प गटातील घरांच्या किंमती. लवकरच जाहीर होणाऱ्या मुंबईतील घरांच्या लॉटरीतील अत्यल्प गटातील घरांच्या किंमती ऐेकाल तर नक्कीच भोवळ येऊन पडला. 

मुंबई मंडळाने वडाळा अॅण्टॉप हिल इथल्या अत्यल्प गटातील घराची किंमत ३० लाख ७१ हजार रुपये इतकी ठरवली आहे. महिना १० ते २५ हजार रुपये कमावणारे ३० लाख ७१ हजाराचं घर कसे घेणार. घेतलं तर महिना २५ ते २८ हजारांचा गृहकर्जाचा हप्ता कसा भरणार हा प्रश्न आहे.

मुंबईतील ११९४ घरांसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी घोषणा शुक्रवारी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली. त्यानुसार या लॉटरीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्वच गटातील घरांचा समावेश असणार आहे. अॅण्टॉप हिल, वडाळा, प्रतिक्षानगर, मानखुर्द, गव्हाणपाडा, घाटकोपर, गोरेगाव आणि परळ इथल्या घरांचा समावेश आहे. यंदाच्या लॉटरीचे वैशिष्ट्य म्हणजे या लॉटरीत सर्वाधिक घर ही अत्यल्प गटासाठी असणार आहेत. अत्यल्प गटासाठी ४८० तर अल्प गटासाठी २९३ घर असणार आहेत.  

या लॉटरीत गरीबांसाठी म्हणजेच अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरे असणार आहेत ही दिलासादायक बाब मानली जाईल. पण त्याचवेळी या घरांच्या किंमती पाहता ही घरे या गटाला परवडणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. तर या भरमसाठ किंमती लक्षात घेता म्हाडाच्या किंमतीच्या धोरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. मुंबई मंडळाकडून लॉटरीतील घरांच्या अंदाजीत किंमती जाहीर करण्यात आल्या असून अत्यल्प गटातील घरांच्या किंमती भोवळ आणणाऱ्या आहेत.
मानखुर्द, पीएमजीपी इथल्या अत्यल्प गटातील घराची अंदाजीत किंमत २७ लाख २६ हजार ७५७ रुपये इतकी असणार आहे. तर प्रतिक्षानगर, सायन इथल्या घराची किंमत २८ लाख ७० हजार ७०० रुपये इतकी असणार आहे. यापुढे जात वडाळा, अॅण्टॉप हिलमधील अत्यल्प गटाने किंमतीचा उच्चांक गाठला आहे. या घराची अंदाजीत किंमत ३० लाख ७१ हजार रुपये अशी आहे.

अत्यल्प गटात महिना २५ हजारापर्यंत वा त्यापेक्षा कमी कमावणाऱ्यांना ३० लाख ७१  हजारांत घर देण्यात येणार आहे. त्यामुळे या घरांसाठी एकाही अर्जदाराला बॅँकेकडून कर्ज मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे हे घर अशा अर्जदारांना परवडणार कसे आणि हे घर ते घेणार कसे असा प्रश्न आहे. अत्यल्प गटातील घर ३० लाख ७१ हजाराचं असताना अल्प गटातील घर मात्र ३० लाख ७ हजार २७ रुपये आणि ३१ लाख ८५ हजार रुपयांमध्ये विकले जाणार आहे. म्हणजेच अल्प गटातील अर्थात महिना २५ हजार ते ५० हजार रुपये कमावणाऱ्या आणि महिना २५ हजारापर्यंत कमावणाऱ्यांसाठी एकाच किंमती घरे दिली जाणार आहेत. त्यामुळे लॉटरीच्या किंमतीमध्ये मुंबई मंडळाने चांगलाच गोंधळ घातला असून यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

म्हाडा अध्यक्षांची कबुली

याविषयी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना विचारले असता, त्यांनी अत्यल्प गटातील घरांच्या किंमती जास्त असल्याचे कबूल केले आहे. तर त्याचवेळी किंमतीचे नव धोरण अद्याप जाहीर झालं नसल्याने यंदाच्या लॉटरीतील घरांच्या किंमती कमी करता येणार नसल्याचे सांगत इच्छुकांना नाराज केलं आहे. दरम्यान, मुंबई मंडळाकडून सध्या जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या किंमती या अंदाजीत असून जाहिरातीपर्यंत त्यात काही बदल होण्याची शक्यता आहे.  पण हे बदल झाले तरी दीड-दोन लाखांनी किंमती इकडे-तिकडे होतील. त्यामुळे या किंमती नक्कीच यंदा अत्यल्प गटाच्या तोंडाला फेस आणतील हे नक्की.

Previous Post

सिडकोच्या घरांची लॉटरी उद्या लागणार

Next Post

वाशीत कॉग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात

Next Post
वाशीत कॉग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात

वाशीत कॉग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात

ज्येष्ठ नागरीकांना ओल्ड एज होम करिता मिळणार भूखंड

ज्येष्ठ नागरीकांना ओल्ड एज होम करिता मिळणार भूखंड

ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com