• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 20, 2018

फिनलँडच्या तरूणीचा विनयभंग करणारा नराधम दोन दिवसात जेरबंद

adminbyadmin
in नवी मुंबई
0
फिनलँडच्या तरूणीचा विनयभंग करणारा नराधम दोन दिवसात जेरबंद

नवी मुंबई: हार्बर रेल्वे मार्गावरुन लोकलने प्रवास करणार्‍या विदेशी तरुणीसोबत अश्‍लिल चाळे करुन तिचा धावत्या लोकलमध्ये विनयभंग करणार्‍या तरुणाला अटक करण्यात अखेर रेल्वे पोलिसांना यश आले आहे. अय्याज सत्तार कुरेशी (२६) असे या तरुणाचे नाव असून त्याने यापूर्वी देखील अनेक महिलांसोबत गर्दीचा फायदा उचलत अश्‍लिल चाळे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पिडीत तरुणी फिनलँड येथील असून ती देवनार येथील टाटा सामाजिक विज्ञान केंद्रात मास्टर ऑफ सोशल वर्कचे शिक्षण घेत आहे. सदर तरुणी गत १७ सप्टेंबर रोजी आपल्या दोन मैत्रिणींसह रबाले येथे अभ्यास दौर्‍यासाठी गेली होती. सायंकाळी त्या ट्रान्स हार्बरने वाशी रेल्वे स्थानकात आल्या. त्यानंतर त्यांनी गोवंडी येथे जाण्यासाठी वाशी रेल्वे स्थानकातून लोकल पकडली. यावेळी पिडीत तरुणी घाईमध्ये महिलांच्या डब्याऐवजी जनरल डब्यामध्ये चढली. लोकलच्या डब्यात गर्दी असल्याने लोकलमध्ये चढताना एका पुरुषाने प्रथम तिचा विनयभंग केला. त्यानंतर ती एका बाजुला उभी झाल्यानंतर पाठीमागे उभ्या असलेल्या आरोपी अय्याज सत्तार कुरेशी (२६) याने सर्वांदेखत पिडीत विदेशी तरुणीसोबत अश्‍लिल चाळे करण्यास सुरुवात केली. सदर प्रकार लक्षात येताच पिडीत तरुणीने आरडा-ओरड करुन आपल्या मोबाईलने आरोपीचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला.
सदर सर्व प्रकार लोकलमध्ये सर्वांदेखत सुरु असताना देखील लोकलच्या डब्यातील एकही प्रवाशी पिडीत तरुणीच्या मदतीसाठी पुढे आला नाही. त्यामुळे गोवंडी रेल्वे स्थानक आल्यानंतर पिडीत तरुणी लोकलमधून उतरुन निघून गेली. मात्र, त्यानंतर तिने सदर प्रकाराची माहिती सोशल मिडीयाच्या ट्विटरवर टाकली. त्यामुळे वाशी रेल्वे पोलिसांनी पिडीत तरुणीसह तिच्या मैत्रीणीला बोलावून सदर घटनेची नोंद करुन घेतली. पिडीत तरुणीने विनयभंग करणार्‍या आरोपीचा फोटो काढला असल्याने त्या फोटोच्या आधारे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, आरोपी अय्याज कुरेशी टिळकनगर रेल्वे स्थानकात उतरुन दुसर्‍या डब्यात चढताना स्पष्टपणे दिसून आला. तसेच त्याचा एक हात वाकडा असल्याचे देखील पोलिसांना सीसीटीव्हीत आढळून आले.
सदर माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलीस गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनवट वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सस्ते आणि त्यांच्या पथकाने समांतर तपास करुन आरोपीची माहिती मिळवून १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रं.७ वर त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने विदेशी तरुणीसोबत आश्‍लल चाळे केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील पिडीत तरुणीने आरोपीच्या काढलेल्या फोटोवरुन अफाट लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात लोकलमधून प्रवास करणार्‍या लाखो प्रवाशांमधून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अवघ्या ४८ तासाच्या आत शोधून अटक केल्याने लोहमार्ग पोलिसांचे कौतुक होत आहे.

Previous Post

गणेशोत्सवातही मूषक नियत्रंकाची वेतनाविषयी ससेहोलपट कायम

Next Post

अमेरिकेतील क्लीव्हलँड मोटरसायकलचा भारतात प्रवेश

Next Post
अमेरिकेतील क्लीव्हलँड मोटरसायकलचा भारतात प्रवेश

अमेरिकेतील क्लीव्हलँड मोटरसायकलचा भारतात प्रवेश

रेल्वे प्रशासनाला ‘राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस’च्या दणक्यानंतर  जाग

रेल्वे प्रशासनाला ‘राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस’च्या दणक्यानंतर जाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com