• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 18, 2018

५ वर्षानंतर एटीएसला डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
५ वर्षानंतर एटीएसला डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला

मुंबई :- नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शरद कळसकरच्या औरंगाबादेतील एका मित्राला कुंवारफल्लीतून ताब्यात घेतले होते. सचिन प्रकाशराव अधुरे असे त्याचे नाव असून, तो कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिनला एटीएसने आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. सचिनने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या अशी माहिती एटीएसने दिली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपणार असून या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करणार असल्याचे एटीएसने स्पष्ट केले. 

एटीएसने दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेतून सचिनला ताब्यात घेतले होते.  विशेष म्हणजे त्याला नोटीस देऊन चौकशीसाठी नेत असल्याचे अधिकाऱ्यांनी त्याच्या नातेवाईकांना सांगितले. त्याच्यासोबत त्याचा भाऊही गेल्याचे सूत्रांकडून समजले. राज्यातील चार शहरांत बॉम्बस्फोट करण्याच्या उद्देशाने बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जमविणाऱ्या आरोपींचा गेल्या आठवड्यात एटीएसने पर्दाफाश केला होता. अटकेतील तीन जणांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील शरद कळसकर याचा समावेश आहे.
कळसकरच्या चौकशीत त्याच्या जवळच्या मित्रांच्या यादीत सचिनचा समावेश असल्याचे एटीएसला समजले. सचिनही हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचे त्याच्या फेसबुकवरील प्रोफाइल चित्रावरून दिसून आले. त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल, तर त्याला अटक केली जाईल; अन्यथा त्यास सोडून देऊ, असे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे सूत्रांकडून समजले. त्या वेळी त्याच्या भावाने मीसुद्धा तुमच्या सोबत येतो, असे म्हणून तोदेखील अधिकाºयांसोबत मुंबईला गेला. निराला बाजार येथील रेडिमेड कापड दुकानात तो काम करतो. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. तो पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह कुंवारफल्ली येथे राहतो. सचिन मे महिन्यात राजाबाजार, शहागंज परिसरात झालेल्या दंगलीच्या वेळी हिंदू वसाहतींतील घरांना संरक्षण देण्याची भाषा करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

डॉ.नरेंद्र दाभोलकर शनिवार पेठेत बालंगधर्व रंगमदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार्‍या पुलावरून जात होते. तेव्हा सात वाजून २० मिनिटांच्या सुमाराला अचानक २५ ते ३० वर्षं वयाचे दोन तरूण काळ्या स्प्लेंडरवरून आले. त्यांनी बाईक लावली आणि दाभोलकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या दाभोलकरांच्या डोक्यात शिरल्या आणि ते खाली कोसळले. त्याच क्षणी दोघेही हल्लेखोर बाईकवर बसून परागंदा झाले.

 

 
Previous Post

काँग्रेसच्या मागणीमुळे सरकारला परंपरा व जबाबदारीची जाणिवः सचिन सावंत

Next Post

कुकशेत गावातील महिला मार्केटचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची संदीप खांडगेपाटील यांची महापौर, आयुक्तांकडे मागणी

Next Post
कुकशेत गावातील महिला मार्केटचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची संदीप खांडगेपाटील यांची महापौर, आयुक्तांकडे मागणी

कुकशेत गावातील महिला मार्केटचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची संदीप खांडगेपाटील यांची महापौर, आयुक्तांकडे मागणी

परवानगीच्या चक्रव्यूहात अडकली गणेशोत्सव मंडळे

परवानगीच्या चक्रव्यूहात अडकली गणेशोत्सव मंडळे

भारताकडे २९२ धावांची भक्कम आघाडी

भारताकडे २९२ धावांची भक्कम आघाडी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com