• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2018

भारतीय फुटबॉल संघाचा बलाढ्य अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय

adminbyadmin
in देश - विदेश
0
भारतीय फुटबॉल संघाचा बलाढ्य अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय

भारताच्या २० वर्षाखालील फुटबॉल संघाने बलाढ्य अर्जेंटिना संघाला हरवण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. भारतीय संघाने अर्जेंटिनाच्या संघाच्या २-१च्या फरकाने पराभव केला. भारतीय फुटबॉल संघाच्या औपचारिक ट्विट हॅण्डलवरून आज पहाटे साडेचार वाजता यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

२० वर्षाखालील स्पर्धेमध्ये पाच वेळा विश्वविजेता राहिलेल्या अर्जेंटिना संघाला भारतीय संघाने स्पेनमधील COITF स्पर्धेमधील समान्यात धूळ चारली. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला दिपक तनगीरने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. तर सामन्याच्या उत्तरार्धात ६८व्या मिनिटाला अन्वर अलीने भारतीय संघाचा स्कोअरबोर्ड २-०ने आघाडीवर नेला. त्यानंतर अर्जेंटिनाचा संघ दबावामध्ये खेळताना दिसला. त्यानंतर अवघ्या चार मिनिटांनंतर अर्जेंटिनाने आपला सामन्यातील पहिला आणि एकमेव गोल नोंदवला. भारतीय संघ या सामन्यात पहिल्या पासूनच आक्रामक पवित्रा घेताना दिसला. त्यातच पहिल्या चार मिनिटांमध्येच गोल नोंदवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला दिसला. मधल्या फळीतील भारतीय खेळाडूंनी चांगला खेळ करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या.

भारताचा गोलकिपर प्रभाकरन गील याने अर्जेंटिना संघाने केलेले अनेक प्रयत्न परतवून लावले. त्यातही ५६व्या आणि ६१व्या मिनिटाला गीलने दाखवलेल्या चपळाईमुळे अर्जेंटिना संघाला बरोबर करण्याची संधी मिळाली नाही. पाच मिनिटांच्या एक्स्ट्रा टाइममध्ये अर्जेंटिना संघाने सामना बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी केलेला प्रयत्न गोल पोस्टला लागला. भारतीय खेळाडूंनी केलेल्या आक्रमाक खेळामुळेच भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला.

या विजयानंतर भारताचे क्रिडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी भारतीय संघाचे ट्विटवरून अभिनंदन केले आहे. वेल डन असे म्हणत त्यांनी भारतीय संघाला शब्बासकी दिली आहे. तसेच भारतीय फुटबॉलचे भविष्य सुरक्षित हातांमध्ये असल्याचे त्यांनी आपल्या ट्वटिमध्ये म्हटले आहे.

Previous Post

मुंबईच्या जुहू किनाऱ्याजवळील शांतीप्रभा प्रेक्षागृहात पार पडणार महोत्सव

Next Post

एकनाथ शिंदेंकडे कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी

Next Post
एकनाथ शिंदेंकडे कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी

एकनाथ शिंदेंकडे कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी

‘आम्हा ‘तिघांना’ पंतप्रधानपदाची अपेक्षा नाही :- शरद पवार

‘आम्हा ‘तिघांना’ पंतप्रधानपदाची अपेक्षा नाही :- शरद पवार

छातीत दुखू लागल्याने छगन भुजबळ रूग्णालयात

छातीत दुखू लागल्याने छगन भुजबळ रूग्णालयात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com