• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 30, 2018

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा पुण्यात

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा पुण्यात

मुंबई, : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  पुणे जिल्हयातील उरळी देवाची येथे शनिवार दि. 16 जून रोजी हा मेळावा होणार आहे. दहावी उत्तीर्ण ते पदवीधर मुला-मुलींना या मेळाव्यातून रोजगाराची संधी मिळणार आहे.

कौशल्य विकास विभाग, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, उद्योग संचालनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यावतीने युवक / युवतींना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून राज्यभर मेळावे घेतले जाणार आहेत.  त्याचा प्रारंभ पुणे जिल्ह्यातील हडपसर परिसरातील उरळी देवाची येथून 16 जून रोजी सकाळी 10.00 ते 02.00 या कालावधीत होणार आहे. 

या मेळाव्यात पुणे परिसर व जिल्ह्यातील प्रमुख उद्योग, कारखाने तसेच माहिती तंत्रज्ञान, औषध उत्पादक, हॉटेल उद्योग आदी क्षेत्रातील 80 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.  संबंधित कंपन्या आपल्या प्रतिनिधीमार्फत इच्छुक उमेदवारांची आवड निवड लक्षात घेऊन प्रत्यक्षात नोकरीची संधी उपलब्ध करुन देणार आहेत. या मेळाव्यात कौशल्य विकास व स्वयंरोजगार या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मेळाव्यात शासनाच्या विविध विभागांची रोजगार-स्वयंरोजगार संबंधीची दालने मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील.  या ठिकाणी इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.  तसेच मेळाव्यानंतरही त्यासंबंधीचा पाठपुरावा केला जाणार आहे.

सीआयआय या उद्योग संघटनेचा या उपक्रमात प्रमुख सहभाग आहे. राज्याच्या विविध भागात अशा प्रकारे मेळावे आयोजित केले जाणार असून त्याद्वारे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी www.balasahebthackrayrojgarmeleva.com या संकेतस्थळावर 4 ते 10 जून दरम्यान नोंदणी करावी, असे आवाहन उद्योग मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 

Previous Post

भाजपच्या दर्शना नारायण चौधरी यांचा दणदणीत विजय

Next Post

नवी मुंबई पोलिसांना तणाव मुक्ती विषयी मार्गदर्शन

Next Post
नवी मुंबई पोलिसांना तणाव मुक्ती विषयी मार्गदर्शन

नवी मुंबई पोलिसांना तणाव मुक्ती विषयी मार्गदर्शन

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी घेतला पावसाळीपूर्व नालेसफाई कामांचा प्रत्यक्ष आढावा

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी घेतला पावसाळीपूर्व नालेसफाई कामांचा प्रत्यक्ष आढावा

समाजसेवक रवींद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रम उत्साहात

समाजसेवक रवींद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रम उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com