• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 14, 2018

लोककल्याणकारी योजना तळागाळात राबविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतत सक्रिय रहावे – आमदार प्रशांत ठाकूर

adminbyadmin
in पनवेल
0
लोककल्याणकारी योजना तळागाळात राबविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतत सक्रिय रहावे – आमदार प्रशांत ठाकूर

स्वयंम न्यूज ब्युरो :- ८३६९९२४६४६

  *  सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी  *   वैजनाथ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश 
 पनवेल :- सर्वसामान्य नागरिकांचा सर्वांगिण विकास करणे, हा भाजपचा मूळ उद्देश आहे, त्या अनुषंगाने केंद व राज्य सरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना राबविल्या जात असून त्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतत सक्रिय रहावे, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (सोमवार, १४ मे ) येथे केले. 
            अखिल गुरव समाजाच्या कर्जत तालुका महिला अध्यक्षा व वैजनाथ ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुनिता खंडू गुरव तसेच कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, हरेश खंडागळे, प्रज्ञा प्रकोष्टचे तालुका संयोजक मंदार मेहंदळे, नैना गुरव, मुकुंद मुकणे, विनीत चक्रदेव, मनोहर मुंबईकर आदी उपस्थित होते. 
          बंडू खंडागळे  यांच्या प्रयत्नातून हा पक्ष प्रवेश झाला असून शिवसेनेच्या कार्यकर्त्या व वैजनाथ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुनिता गुरव, मारुती मिसाळ, भाऊ पवार, लक्ष्मण मुकणे, विठ्ठल पवार, सुरेखा पवार, तुळशी पवार, सुवर्णा घनवट, मछिंद्र वाव्हळ, सुनंदा गुरव, सुलोचना गुरव, पांडुरंग गुरव, श्रीरंग गुरव, सुलभा गुरव, रमेश गुरव, सुरेश कौदरे, खंडू गुरव, रविंद्र गुरव, कृष्णा मुकणे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. 
               यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवगतांचे स्वागत करून या प्रवेशामुळे भाजप अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी ग्वाहीही आ. ठाकूर यांनी दिली.  ते पुढे म्हणाले कि २०२२ सालापर्यंत प्रत्येकासाठी घर देण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे, त्यानुसार केंद्र व राज्य सरकार काम करीत असून जनहिताची विविध योजना राबविणारे हे सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना नमूद केले. 
Previous Post

राजस्थान रॉयल्स ने मुंबई इंडियंस चा 7 गडी राखून पराभव केला

Next Post

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत नवी मुंबईकर चमकले

Next Post
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत नवी मुंबईकर चमकले

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत नवी मुंबईकर चमकले

पर्यावरणपूरक इलेक्ट्रीकल दुचाकींच्या शोरूमचे लोकनेते गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन

पर्यावरणपूरक इलेक्ट्रीकल दुचाकींच्या शोरूमचे लोकनेते गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन

घणसोलीत श्री सदस्यांची स्वच्छता मोहिम

घणसोलीत श्री सदस्यांची स्वच्छता मोहिम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com