• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 10, 2018

शासन आपल्या दारी” कार्यक्रमांतर्गत दारावे गावातील ग्रामस्थांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड वाटप

adminbyadmin
in Uncategorized
0
शासन आपल्या दारी” कार्यक्रमांतर्गत दारावे गावातील ग्रामस्थांना  आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड वाटप

नवी मुंबई :- नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना 1972 नंतर अखेर न्याय मिळाला असून बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील जमिनी संपादित केल्यानंतर 24 पैकी 14 गावांच्या गावठाणांचे ठाणे जिल्हाधिकारी मार्फत सर्वेक्षण पूर्ण होऊन मालमत्ता पत्राचे वाटप करण्यास प्रत्येक गावात सुरुवात झाली आहे. “शासन आपल्या दारी” कार्यक्रमांतर्गत सिटी सर्वेक्षण झालेल्या गावातील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वितरणास प्रत्येक गाव निहाय सुरुवात झाली असून दि.08.03.2018 रोजी शिरवणे गाव येथील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले तसेच “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमांतर्गत शासकीय अधिकारी यांनी स्वतः आपल्या दारात येऊन आपली मालमत्ता पत्रके वाटप केली असून सदर मालमत्ता पत्रके वाटप शिबिरे प्रत्येक गावात घेण्यात येणार आहेत. 

 नवी मुंबई हे विकसित शहर असून शहराच्या विकासासाठी नवी मुंबईतील ग्रामस्थांनी त्यांच्या 100%जमिनी दिलेल्या आहेत. गावठाणातील ग्रामस्थांची बांधलेली घरे नियमित करावीत, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या गावठाणांचा सिटी सर्व्हे करून प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, या संदर्भात बेलापूरच्या आमदार  सौ.मंदाताई म्हात्रे यांनी अनेकवेळा शासनदरबारी पाठपुरावा केला होता. नगरविकास प्रधान सचिव नितीन करीर, सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी तसेच ठाणे जिल्हाधिकारी  डॉ. महेंद्र कल्याणकर यांजबरोबरही सदर संदर्भात अनेक बैठकी झाल्या होत्या तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मालमत्ता पत्रके (प्रॉपर्टी कार्ड) मिळावे हा अनेक वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा,याकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गावागावात जाऊन प्रकल्पग्रस्तांसह गाव बैठकी घेतल्या होत्या. बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश येऊन नवी मुंबई गावठाणक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते  प्रॉपर्टी कार्ड वाटपास सुरुवात करण्यात आली होती. आता स्वतः शासकीय अधिकारी शासन आपल्या दारी अंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरण करणार असल्याने सर्व प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नवी मुंबईतील शिरवणे गावातील प्रकल्पग्रस्तांसाठी हा आनंदाचा क्षण असून गावठाणातील प्रत्येक घरांस आपल्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असल्याने आपल्या मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा प्रकल्पग्रस्तांना मिळाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मालमत्ताबाबत कायदेशीर प्रक्रिया व घरे विकसित करण्याकरिता येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. अनेक वर्षापासुनचा सदर प्रश्न मार्गी लागल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरातून बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक केले जात आहे.

 यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि,नवी मुंबईतील ग्रामस्थांनी त्यांच्या 100% जमिनी दिलेल्या असताना नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या गावठाणांचा सिटी सर्व्हे करून प्रत्येक घराला मालमत्ता पत्रके(प्रॉपर्टी कार्ड) देण्यात यावे, हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस तसेच शासनदरबारी अनेक वेळा पाठपुरावा केला होता.जिल्हाधिकारी यांजसमवेतही अनेक बैठकी पार पडल्या. सदर प्रश्नाबाबत गावागावात ग्रामस्थांच्या बैठकीही घेतल्या गेल्या.आज अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यामुळे नवी मुंबई ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांना आपल्या मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा मिळाला असल्यामुळे अनियमित घरे नियमित होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचे त्या म्हणाल्या.

 यावेळी परिवहन सदस्य काशीनाथ पाटील, डॉ. राजेश पाटील, परीक्षण भूमापक श्री. सुनील ढोमणे, वरिष्ठ लिपिक श्री. भहाडकर,  तसेच असंख्य प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा होणार पुनर्विकास

Next Post

स्त्री शक्तीचा जागर करीत 1300 हून अधिक महिलांनी मॅरेथॉनमध्ये घेतली भरारी

Next Post
स्त्री शक्तीचा जागर करीत 1300 हून अधिक महिलांनी मॅरेथॉनमध्ये घेतली भरारी

स्त्री शक्तीचा जागर करीत 1300 हून अधिक महिलांनी मॅरेथॉनमध्ये घेतली भरारी

रविवारपासून कुकशेत गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह

रविवारपासून कुकशेत गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह

लोकनेते गणेश नाईक यांचा ‘वन बुथ,टेन युथ’चा नारा

लोकनेते गणेश नाईक यांचा ‘वन बुथ,टेन युथ’चा नारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com