• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 6, 2018

पुण्याचा महेंद्र चव्हाण ‘नवी मुंबई महापौर श्री’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा मानकरी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पुण्याचा महेंद्र चव्हाण ‘नवी मुंबई महापौर श्री’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा मानकरी
फरहान सय्यद याने पटकाविला ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ चा बहुमान
 
नवी मुंबई :- नवी मुंबई ही वैशिष्ट्यपूर्ण नागरी सेवा सुविधा प्रकल्पांसाठी ज्याप्रमाणे देशभरात नावाजली जाते त्याचप्रमाणे येथील कलावंत, खेळाडूंसाठी विविध उपक्रम राबवून त्यांच्यातील अंगभूत गुणांना वाव देत सांस्कृतिक शहर म्हणूनही ओळखली जावी हा नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न असून त्यादृष्टीने विविध कला, क्रीडा उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी शरीरसौष्ठवाची आवड जपणारे तरूण त्यामधून आरोग्यपूर्ण जीवनाचा संदेश जनमानसात प्रसारित करतात अशा शब्दात शरीरसौष्ठवपटूंचे कौतुक केले.  नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या ‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय’ आणि ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ खुल्या शरीरसौष्ठव स्पर्धेनिमित्ताने ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
180 हून अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत ‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय’ किताब पुण्याच्या महेंद्र चव्हाण या शरीरसौष्ठवपटूने 1 लक्ष 25 हजार पारितोषिक रक्कमेसह पटकाविला. ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ पुरस्काराचा 50 हजार रक्कमेच्या पुरस्काराचा मानकरी फरहान सय्यद ठरला.
याप्रसंगी नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार, सभागृहनेते श्री. रविंद्र इथापे, महाराष्ट्र बॉडी बिल्डींग फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार श्री. संजीव नाईक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. विशाल डोळस व उपसभापती श्री. रमेश डोळे, महाराष्ट्र बॉडी बिल्डींग फेडरेशनचे मुख्य संचालक श्री.मदन कडू, सहसचिव श्री.सुनिल शेडगे व श्री.हेमंत खेबडे, आणि खजिनदार श्री.शरद मारणे तसेच नवी मुंबई बॉडी बिल्डींग असो.चे अध्यक्ष श्री.जी.एस.पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र बॉडी बिल्डींग फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार श्री. संजीव नाईक यांनी कोणताही उपक्रम सातत्याने सुरू ठेवणे ही मोठी गोष्ट असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेने 1996 पासून सातत्याने महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करून शहरातील व्यायामप्रेमी तरूणांचा उत्साह वाढविला आहे तसेच राज्यातील शरीरसौष्ठवपटूंनाही प्रोत्साहित केले आहे याबद्दल कौतुक केले.
‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय’ शरीरसौष्ठव किताबाचा मानकरी महेंद्र चव्हाण याने आपल्या मनोगतात मागील 11 वर्षांपासून या स्पर्धेत सहभागी होत असल्याचे सांगत या स्पर्धेची आम्हां शरीरसौष्ठवपटूंच्या मनात एक वेगळी प्रतिमा असून या स्पर्धेची आम्ही सर्वजण वाट पाहत असतो असे मत मांडले. या स्पर्धेचे टायटल मारायचे हे माझे 11 वर्षांपासून स्वप्न होते, अनेकदा ते स्वप्न अपूर्ण राहिले मात्र जिद्द सोडली नाही अखेरीस आज ते स्वप्न पूर्ण झाल्याचा वेगळा आनंद होत असल्याचे त्याने सांगितले.
‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय’ स्पर्धेमध्ये मुंबई उपनगरचा संदेश सकपाळ, ठाण्याचा नितिन म्हात्रे, मुंबई उपनगरचा प्रतिक पांचाळ, ठाण्याचा श्रीनिवास खाखी, मुंबई उपनगरचा विघ्नेश पंडीत, मुंबई उपनगरचा सुशील मुरकर, मुंबई उपनगरचा सकिंदर सिंग या सातही गटातील विजेत्यांशी लढत देत  85 किलो वरील वजनी  गटाचा विजेता पुण्याचा महेंद्र चव्हाण हा ‘नवी मुंबई महापौर श्री किताब’ विजेता ठरला.  मुंबई उपनगरचा सकिंदर सिंग याने उपविजेतेपदाचा बहुमान संपादन केला. पुण्याच्या आकाश आवटे याने ‘बेस्ट पोझर’ तसेच मुंबईच्या सुशील मुरकर याने ‘प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटू’ ही पारितोषिके पटकाविली.
‘नवी मुंबई महानगरपालिका श्रेत्र श्री’ स्पर्धेमध्ये फरहान सय्यद हा क्षेत्र श्री किताब विजेता तसेच शैलेश मोकल हा उपविजेता ठरला.
राज्यस्तरीय स्पर्धेत 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो, 85 किलो व 85 किलोवरील असे आठ वजनी गट होते. या सर्व गटातील सहा विजेत्यांना पारितेषिक रक्कमेसह प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात आली. अशाचप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी 50 किलो, 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो तसेच 70 किलोवरील व 75 किलो वजनी गटातील प्रत्येकी सहा विजेत्यांना प्रशस्तिपत्रासह रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.
Previous Post

सागरी सुरक्षा सांभाळणार्‍या सुरक्षा रक्षकांनाच पाच महिने पगार नाही

Next Post

आमदारांच्या बंगल्यासमोरील पथदिवे गेले विझून!

Next Post
आमदारांच्या बंगल्यासमोरील पथदिवे गेले विझून!

आमदारांच्या बंगल्यासमोरील पथदिवे गेले विझून!

दिघा परिसरातील नागरी सुविधांची पुर्तता करणार – महापौर जयवंत सुतार

दिघा परिसरातील नागरी सुविधांची पुर्तता करणार - महापौर जयवंत सुतार

सारसोळे जेटीतील गाळ काढण्याची मनोज मेहेर यांची महापौर व आयुक्तांकडे मागणी

सारसोळे जेटीतील गाळ काढण्याची मनोज मेहेर यांची महापौर व आयुक्तांकडे मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com