• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 11, 2018

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 275 हून अधिक कुस्तीगीरांचा सहभाग

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 275 हून अधिक कुस्तीगीरांचा सहभाग

 सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

नवी मुंबई :  महाराष्ट्राच्या मातीची ओळख सांगणा-या कुस्ती या क्रीडा प्रकाराबद्दल आधुनिक शहर म्हणून ओळख सांगणा-या नवी मुंबईतही कमालीची आपुलकी आहे. मागील सात वर्षे अतिशय उत्साहात संपन्न होत असलेल्या नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यावर्षी तब्बल 275 हून अधिक कुस्तीगीरांनी सहभाग घेतला असून त्यात 30 युवतींचाही समावेश आहे हे यावर्षीच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोपरखैरणे सेक्टर 8 येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या मैदानात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा तालिम संघाच्या सहकार्याने 10 व 11 फेब्रुवारी 2018 रोजी आयोजित केलेल्या दोन दिवसीय महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. विशाल डोळस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष श्री. सर्जेराव शिंदे व खजिनदार श्री. सुरेश पाटील, माजी नगरसेवक श्री. कोंडिबा तिकोने, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, नवी मुंबई कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री. कर्नल शिरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ही स्पर्धा पुरूष व महिला अशा दोन्ही गटात हेत असून कुस्तीगीरांच्या मागणीनुसार यावर्षी राज्यस्तरीय युवकांचा एक गट वाढविण्यात आला आहे तसेच ‘दंगल’ चित्रपटातून प्रेरणा घेऊन महिला कुस्तीगीरांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन महिलांचाही एक राज्यस्तरीय गट वाढविण्यात आला आहे. अशाप्रकारे राज्यस्तरीय तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रस्तरीय अशा एकूण 8 वजनीगटांत ही स्पर्धा खेळवली जात आहे.

या स्पर्धेतील विजेत्या राज्यस्तरीय कुस्तीगीरास 1 लाख रक्कमेचा ‘नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय’ किताब मानाच्या गदेसह प्रदान केला जाणार आहे. 55 ते 65 किलो राज्यस्तरीय विशेष वजनी गटातील विजेत्या कुस्तीगीरास 21 हजार रक्कमेचा ‘राज्यस्तरीय नवी मुंबई महापौर युवक चषक’ मानाच्या गदेसह दिला जाणार आहे. सर्व वजनी गटातील प्रथम चार क्रमांकांना चषक, प्रशस्तिपत्र आणिएकूण 4 लाखाहून अधिक रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

इतर क्रीडा प्रकारांप्रमाणेच कुस्ती खेळामध्येही नवी मुंबईतील युवक रूची घेताना दिसतात. त्यामुळे या उदयोन्मुख खेळाडूंना आपले कसब दाखविण्याची संधी मिळावी तसेच त्यांच्यासमोर राज्यातील नामांकित पैलवानांच्या खेळाचे प्रदर्शन होऊन त्यामधून काही शिकता यावे ही भूमिका नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिका प्रतिवर्षी कुस्तीचा हा राज्यस्तरीय फड भरवित असून या सामन्यांतून नामांकीत मल्लांचा चुरशीचा खेळ अनुभवण्यासाठी कुस्ती शौकिनही मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असतात. यावर्षी 275 हून अधिक पुरूष महिला कुस्तीगीरांचा सहभाग असल्याने राष्ट्रीय स्तर गाजवणा-या पैलवानांचा खेळ बघण्यासाठी उद्घाटनापासूनच प्रेक्षक गॅलरी क्रीडारसिकांनी भरलेली होती. 

Previous Post

नेरूळच्या सागरदीप सोसायटीतील रहीवाशांचे स्वच्छता अभियान उत्साहात

Next Post

जुईनगरमध्ये अखेर घरामध्ये थेट वाहिनीच्या माध्यमातून महानगर गॅस पोहोचलाच

Next Post
जुईनगरमध्ये अखेर घरामध्ये थेट वाहिनीच्या माध्यमातून महानगर गॅस पोहोचलाच

जुईनगरमध्ये अखेर घरामध्ये थेट वाहिनीच्या माध्यमातून महानगर गॅस पोहोचलाच

नवी मुंबईकरांना वेध लागले महाशिवरात्रीनिमित्त बामणदेवाच्या भंडार्‍याचे

नवी मुंबईकरांना वेध लागले महाशिवरात्रीनिमित्त बामणदेवाच्या भंडार्‍याचे

काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला

सैन्यदलाच्या अवमानाबद्दल मोहन भागवत यांनी तात्काळ माफी मागावी: खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com