• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 23, 2017

भर दुपारी नेरूळच्या रस्त्यावर बर्निग कारचा थरार

adminbyadmin
in Uncategorized
0
भर दुपारी नेरूळच्या रस्त्यावर बर्निग कारचा थरार

स्वयंम न्युज ब्युरो : 8082097775
नवी मुंबई : भरधाव वेगात जाणार्‍या मारूती गाडीने समोर असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर काही क्षणातच मारूती गाडीने पेट घेतला. या घटनेत मारूती गाडी अवघ्या काही मिनिटातच जळून भस्मसात झाली आहे. या दुर्घटनेत गाडीत बसलेल्या तीन जणांचे भ्रमणध्वनी, वाहन चालविण्याचे परवाने जळाले असून रस्त्याच्या मध्यभागी असणार्‍या पथदिव्यांची (स्ट्रीट लाईट) केबल्स पूर्णपणे जळाली आहे.
नेरूळ सेक्टर ५ येथे डीवायपाटील रूग्णालयापासून पुढे गेल्यावर एसबीओ स्कूलजवळ ही घटना घडली. गाडी पेटताच गाडीतील तीन जणांनी तात्काळ रस्त्यावर धाव घेतल्याने सुदैवाने जिवितहानी टळली. गाडी जळताच काही मिनिटातच नेरूळ पोलिस आणि अग्निशमनची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. अवघ्या १० मिनिटातच आगीवर नियत्रंण मिळविण्यात अग्निशमनला यश आले असले तरी गाडी मात्र पूर्णपणे जळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
टोईग गाडी आणून जळीत गाडी रस्त्यावरून दूर हटविण्यात आली असून या ठिकाणी घटनास्थळी असणारे नेरूळमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी धावपळ केली. बघ्यांची गर्दी हटविताना त्यांनी वाहतुक कोंडी होवू नये म्हणून वाहनचालकांना मार्गदर्शन केले. पथदिव्याची केबल्स जळाल्याचे रतन मांडवे यांनी नेरूळ पोलिसांच्या निदर्शनास आणून देताना तात्काळ पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाला संपर्क साधला. पथदिवे सुरू झाल्यावर जळीत केबल्समुळे होणारी संभाव्य दुर्घटना रतन मांडवे यांच्या तत्परतेने टळल्याचे माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

Previous Post

बकालपणाच्या विळख्यात अडकला जुईनगरचा चिंचोली तलाव

Next Post

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकातील फेरीवाले हटवा ! अन्यथा अधिकाऱ्यांच्या दालनात फेरीवाले बसवू…

Next Post
नवी मुंबईतील रेल्वे स्थानकातील फेरीवाले हटवा !  अन्यथा अधिकाऱ्यांच्या दालनात फेरीवाले बसवू…

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकातील फेरीवाले हटवा ! अन्यथा अधिकाऱ्यांच्या दालनात फेरीवाले बसवू…

शरद पवार राजकारणातील सुसंस्कृत, संवेदनशील व्यक्तिमत्व  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शरद पवार राजकारणातील सुसंस्कृत, संवेदनशील व्यक्तिमत्व - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कचरा न उचलल्यास विभाग अधिकारी दालनात कचरा टाकण्याचा मनसेचा इशारा

कचरा न उचलल्यास विभाग अधिकारी दालनात कचरा टाकण्याचा मनसेचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com