• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 15, 2017

नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
राष्ट्रवादी सोशल मिडीया सेल तर्फे गरिबांना ब्लॅंकेट व लहान मुलांना खाऊचे डब्बे वाटपाचे आयोजन
नवी मुंबई : सोशल मिडीयावर सक्रिय असणार्‍या अधिकाधिक नवी मुंबईकरांना राष्ट्रवादी काँग्रेसची सोशल मिडीयाची टीम एव्हाना चांगलीच परिचित आहे. त्यातील कोणी बुध्दीवादाचे प्रामाण्य देत विरोधकांना सक्षम उत्तरे देतो, तर कोणी आक्रस्ताळेपणा करत विरोधकांवर प्रतिहल्ला करतो, तर कोणी शालजोडीतील टोमणे मारत विरोधकांना नामोहरम करतो. हीच राष्ट्रवादी काँग्रेसची सोशल मिडीया सामाजिक कामातही आपले योगदान देत असते. महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे भाग्यविधाते आणि ठाणे जिल्ह्यात विकासपर्व म्हणून ओळखल्या जाणार्‍या माजी मंत्री गणेश नाईकांच्या जन्मदिनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मिडीयाच्या टिमने गोरगरीबांना ब्लॅंकेट व लहान मुलांना डब्बे आणि बिस्कीट वाटून पुन्हा एकवार आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन नवी मुंबईकरांना घडवून दिले जाणार आहे.ह्याच सोशल मिडीया टीमने आमदार संदीप नाईक ह्यांचा जन्मदिनी गरिबांना आहार वाटपाचा कार्यक्रम घेतला होता.
राहूल शिंदे,  देवनाथ म्हात्रे,  जयंत म्हात्रे, हरिश भोईर,  संदेश गायकवाड, सुनील म्हात्रे,  नंदकिशोर मढवी,  अक्षय पाटील, अजय पंडित, शिरीष वेटा, संतोष म्हात्रे आदी घटक गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसची सोशल मिडीया सक्षमपणे सांभाळत आहेत. सोशल मिडीयावर आक्रमकता दाखविणार्‍या या टीमचा सामाजिक बांधिलकीचा एक दुसरा चेहराही नवी मुंबईकरांसाठी आजही काही प्रमाणात अपरिचित आहे. 15 सप्टेंबर रोजी गणेशजी नाईकांच्या जन्मदिनी वाशी रेल्वे स्थानक, नेरुळ, सानपाडा, शहरातील सिग्नल, उद्याने, सार्वजनिक जागा आदी ठिकाणी आढळून आलेल्या गरीब लोकांना एकत्रित करून त्यांना ब्लॅंकेट व लहान मुलांना खाऊचे डब्बे व बिस्कीट देऊन साजरा करण्यात आला.
लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या सूचनेवरून त्यांचा वाढदिवसाच्या दिवशी बॅनरबाजी ना करता समाजउपयोगी कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा करा असे आव्हान करण्यात आले होते त्याला प्रतिसाद देत आज आम्ही गरिबांना येणाऱ्या थंडीच्या दिवसात गरम उभ मिळावी म्हणून ब्लॅंकेट वाटप आणि लहान मुलांना डब्बे तसेच बिस्कीट वाटप केले असल्याचे राष्ट्रवादी बेलापूर विधानसभा अध्यक्ष देवनाथ म्हात्रे ह्यांनी सांगितले. सादर वाटप प्रसंगी वॉर्ड क्रमांक ९५ चे वॉर्ड अध्यक्ष अक्षय पाटील, सोशल मीडिया सेल चे जयंत म्हात्रे, हरेष भोईर, शिरीष वेटा, युवक अध्यक्ष संदेश गायकवाड उपस्थित होते.

 

Previous Post

गंणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

नेरूळमध्ये एनएमएमटी प्रवासी पास केंद्र चालू करण्याची नगरसेवक गिरीश म्हात्रेंची मागणी

Next Post
नेरूळमध्ये एनएमएमटी प्रवासी पास केंद्र चालू करण्याची नगरसेवक गिरीश म्हात्रेंची मागणी

नेरूळमध्ये एनएमएमटी प्रवासी पास केंद्र चालू करण्याची नगरसेवक गिरीश म्हात्रेंची मागणी

“स्वच्छता हीच सेवा” मोहीमेस उत्साहात प्रारंभ

“स्वच्छता हीच सेवा” मोहीमेस उत्साहात प्रारंभ

नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

फिफावर करोडो रुपयांची उधळपट्टी कशाला ? मनसेचा आयुक्तांना सवाल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com